आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी दुखावले तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे : तस्लिमा नसरीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बांगलादेशच्या स्वयंनिर्वासित लेखिका तस्लिमा नसरीन यांनी अभिव्यक्तीचे शत-प्रतिशत स्वातंत्र्य असायला हवे, असे म्हटले आहे. अभिव्यक्तीमुळे कोणी दुखावले तरीही हरकत नाही. आम्ही आपले तोंड उघडले नाही तर समाज चांगला होण्यासाठी महिलांशी घृणा करणारे, धार्मिक कंट्टरपंथीय आणि समाजाच्या सर्व वाईट शक्तींचा विरोध केला पाहिजे.

दिल्ली साहित्य संमेलनातील कमिंग ऑफ द एज ऑफ इनटॉलरन्स विषयावर शनिवारी तस्लिमा म्हणाल्या, राजा राममोहन राॅय सतीप्रथेविरुद्ध लढत होते तेव्हाही लोकांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यांनी पश्चिम बंगालच्या माल्दामध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख केला. माझ्या मते भारत एक सहिष्णू देश आहे. मात्र, काही लोक असहिष्णू आहेत. प्रत्येक समाजात काही लोक असहिष्णू असतात. हिंदू कट्टरवादावर बोलले जाते. मात्र, त्याचबरोबर मुस्लिम कट्टरवादावरही चर्चा व्हायला पाहिजे. तस्लिमांना बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यांची कादंबरी "लज्जा'वर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप होता.

तोंड गप्प का करायचे ?
ज्या वेळी ईश्वर चंद्र विद्यासागर मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत होते तेव्हाही धार्मिक कट्टरपंथी दु:खी होते. मात्र, आम्ही परंपरांवर टीका करतो तेव्हा परंपरावादी संवेदना दुखावतात. असे असेल तर आम्ही तोंड गप्प करायचे का?
बातम्या आणखी आहेत...