आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस्त्री कंपन्या ताब्यात घेण्याचा कट रचत होते, टाटा सन्सचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टाटा समूहाची ग्रुप कंपनीने टाटा सन्सने आपले माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्यावर गुरुवारी गंभीर आरोप केले. मिस्त्रींवर विश्वासघाताचा आरोप करत ते टाटा समूहाच्या प्रमुख कंपन्या ताब्यात घेऊ इच्छित होते. या कंपन्यांच्या बोर्डातून अन्य प्रतिनिधींना काढून ते एकटेच टाटा सन्सचे प्रतिनिधी राहू इच्छित होते. ४ वर्षांपासून हा कट सुरू होता, असे म्हटले आहे. मिस्त्री यांना २४ ऑक्टोबर रोजी चेअरमनपदावरून हटवण्यात आले होते. दरम्यान, ईजीएमची तातडीची बैठक बोलावून टीसीएसच्या चेअरमनपदावरून मिस्त्रींना हाकलून इशात हुसेन यांची हंगामी चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली.
मिस्त्रींवर १५ दिवसांनी टाटा सन्सचा पलटवार
सायरस यांचे आरोप
अनेक कंपन्यांची स्थिती वाईट होती. समूहाला १.१८ कोटी रुपये बुडीत खात्यात टाकावे लागले असते.

टाटा सन्सचे उत्तर
त्यांना हटवल्यानंतर हे कळले का? कंपन्या सुधारण्याची ना इच्छा दाखवली, ना प्रयत्न केले.

आरोप : स्वतंत्ररीत्या काम करू दिले नाही. टाटा ट्रस्टचा नेहमी हस्तक्षेप होता.
उत्तर : चूक. लोकांची दिशाभूल करण्यासाठी वस्तुस्थितीचा विपर्यास केला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...