नवी दिल्ली - रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांना आता तत्काळच्या कोट्यातून वेटिंग तिकिट मिळणे बंद होणार आहे. आरक्षणासंबंधीचे नवे नियम 1 ऑगस्टपासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून तयारीही सुरू करण्यात आल्या आहेत. तत्काळच्या कोट्यामधून केवळ त्यासाठी ठरवून दिलेल्या बर्थसाठीच बुकींग करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. प्रवाशांना तत्काळसाठी वेटिंग तिकिट दिले जाणार नाही. सध्या ठरलेले बर्थ बूक झाले तरी, तत्काळ कोट्यातून वेटिंगचे तिकिट दिले जाते. रेल्वे अधिका-यांच्या मते जुलैमध्ये सादर होणा-या रेल्वे अर्थसंकल्पात अनेक जुने नियम बदलण्याची तयारी सुरू आहे. त्यातच या नियमाचीही समावेश असण्याची शक्यता आहे.
शुल्क कमी होण्याची शक्यता
तत्काळ कोट्यातून बर्थ बूक करण्यासाठी प्रवाशांना ठरावीक भाड्यापेक्षा 150 रुपये अतिरिक्त शुल्क मोजावे लागते. तर एसी कोचसाठी हे शुल्क 300 रुपयांपेक्षाही अधिक असते. प्रवास केला नाही तर तत्काळचे तिकिट रद्दही होत नाही. त्याचप्रमाणे वेटिंग तिकिट क्लिअर झाले नाही तरीही पैसे बुडतात. या सर्व अडचणी दूर करण्यासाठीच रेल्वे बोर्डाने तत्काळ तिकिट शुल्क कमी करण्याचे संकेत दिले आहेत.
पुढे वाचा : नवे नियम कसे असतील...