आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंवर हल्ल्याची चाैकशी सुशीलकुमार शिंदेंकडे, दिल्लीत राहुल गांधींच्या रॅलीत हाणामारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या किसान रॅलीमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा अाणि प्रदेशाध्यक्ष अशाेक तंवर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या मारहाणीची चाैकशी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे करणार अाहेत. काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांनी या चाैकशीचा अहवाल तत्काळ सादर करण्याची सूचना केली अाहे.

दरम्यान, भूपेंद्रसिंंह हुड्डा यांनी राहुल गांधी यांच्याकडे अापली बाजू मांडली. सुमारे तासभर झालेल्या या चर्चेत त्यांनी हरियाणापासून ते उत्तर प्रदेशपर्यंतच्या स्थितीचा अाढावा घेतला. प्रदेशाध्यक्ष अशाेक तंवर यांनीदेखील काँग्रेसच्या काेणत्याही नेत्याविरुद्ध अांदाेलन न करण्याचे जाहीर अावाहन केले. दाेषी अाणि कारस्थानी लाेकांवर माझे वरिष्ठ नेते याेग्य ती कार्यवाही करतील, अशी अपेक्षा व्यक्त करत कार्यकर्त्यांना त्यांनी विश्वास दिला. तंवरच्या समर्थकांनी माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी फतेहाबाद जिल्ह्यातील भुनामध्ये प्रवेश करण्यास मनाई करत इशारादेखील दिला.

काँग्रेसचे दलित कार्ड
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून मारहाण प्रकरणाची चाैकशी करवली जात असल्यामुळे त्याकडे काँग्रेसच्या दलित राजकारणाच्या दृष्टिकाेनातून पाहिले जात अाहे. प्रदेशाध्यक्ष तंवर यांना झालेल्या मारहाणीकडे दलितांच्या शाेषणाचे एक प्रकरण म्हणून पाहिले जायला नकाे या दृष्टीने काँग्रेस नेते प्रयत्नशील अाहेत. जर असे झाले तर उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपसह अन्य विराेधी पक्ष निवडणूक मुद्दा बनवतील, असे नेत्यांना वाटत अाहे. त्यामुळेच सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे चाैकशीची जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...