आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तावडे दिल्लीला अाले; सुगावा न लागू देताच परतले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राज्याचे शिक्षणमंत्री विनाेद तावडे हे काेणालाही सुगावा न लागू देता गुरुवारी दिल्लीत हाेते. त्यांनी काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या अाणि पुन्हा मुंबई गाठली.
एरवी दिल्लीत अाल्यावर विनाेद तावडे हे महाराष्ट्र सदनात थांबतात. सगळ्यांशी मनमाेकळ्या गप्पा मारतात. त्यांचा बराच वेळ पत्रकारंसमवेत सदनाच्या लाॅबीमध्येही जात असताे. परंतु या वेळी तसे काही घडले नाही. अलीकडेच त्यांचे बनावट पदवी प्रकरण चर्चेत अाल्यावर त्यांची दिल्लीतील ही पहिलीच गाेपनीय भेट हाेती. सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार तावडे बुधवारी रात्री दिल्लीत पाेहाेचले. त्यांनी शासकीय वाहनांचा वापर केला, परंतु ते महाराष्ट्र सदनात न येता खासगी हाॅटेलमध्ये थांबले. गुरुवारी सकाळी त्यांना ब्रिटिश कौन्सिलमध्ये झालेल्या बैठकीत सहभागी व्हायचे होते. भाजपच्या काही नेत्यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यांच्यावर विराेधकांनी जे अाराेप केलेत त्याचा खुलासा त्यांनी पक्षातील काही पदाधिका-यांकडे केला.
त्यानंतर ते लगेच ते मुंबईला परतले. तावडेंच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.