आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tax Raids In Karnataka Shivakumar, Ruckus In Rajya Sabha By Congress As It Happened

कर्नाटकमध्ये IT रेड: छाप्याचे राज्यसभेत पडसाद, जेटली म्हणाले- गुजरात MLAsसाठी छापा नव्हता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मंत्री शिवकुमार यांच्या 39 ठिकाण्यांवर पडलेल्या छाप्यांचे पडसाद राज्यसभेत उमटले. राज्यसभेच्या एका जागेसाठी भाजपने राजकारणाचा स्तर अतिशय खाली नेल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. राज्यसभेच या छाप्यांचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले, 'छापा ज्या वेळी पडला आहे त्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होतात.' त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री अरुण जेटली म्हणाले, 'ज्या रिसॉर्टमध्ये आमदार थांबले होते तिथे छापेमारी झालेली नाही. मंत्री शिवकुमार यांची फक्त चौकशी केली गेली आहे.' मंगळवारी काँग्रेस आणि विरोधीपक्षांनी स्वंयपाकाच्या गॅसची सबसिडी बंद करण्याच्या मुद्यावर दोन्ही सभागृहात गदारोळ केला. 
 
सत्तेच्या गैरवापराचा ट्रेंड निर्माण होत आहे... 
- राज्यसभेत काँग्रेस सदस्य आनंद शर्मा म्हणाले, 'सत्येच्या गैरवापराचा जणूकाही नवा ट्रेंड सुरु झाला आहे.'
- कर्नाटकमधील मंत्री आणि त्यांच्या आमदार बंधूंवर गुजरातच्या आमदारांच्या पाहुणचाराची जबाबादारी आहे. अशावेळी त्यांच्यावर छापेमारी होत असेल तर अनेक प्रश्न उपस्थित होतात. 
- गुलाम नबी आझाद म्हणाले, 'भाजपच्या त्या लोकांवर छापेमारी होण्याची गरज आहे ज्यांनी काँग्रेस आमदारांना 15 कोटी रुपये ऑफर केले.'  
- अरुण जेटली म्हणाले, 'ज्या रिसॉर्टमध्ये आमदार मुक्कामी आहे तिथे कोणतीही चौकशी झालेली नाही. एकाही आमदाराची चौकशी करण्यात आली नाही. फक्त कर्नाटकातील एका मंत्र्याच्या ठिकाण्यांवर छापे टाकण्यात आले आहे.'
 
मंत्र्याच्या 39 ठिकाण्यांवर छापे 
- इनकम टॅक्स विभागाने बुधवारी कर्नाटकचे मंत्री डी.के. शिवकुमार यांच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानसह 39 ठिकाणी छापेमारी केली. 
- डी.के. शिवकुमार हे सिद्धारमय्या सरकारमध्ये ऊर्जा मंत्री आहेत. शिवकुमार यांच्यासह खासदार डी.के. सुरेश आणि काँग्रेस एमएलसी ए. रवी यांच्या ठिकाण्यांवर आयटीने छापेमारी केली. 
- वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शिवकुमार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानातून 5 कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. 
- काँग्रेस नेते अहमद पटेल म्हणाले, 'भाजप राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी कोणत्याही स्तरावर जायला तयार आहे. ते हताश आणि निराश झाले आहेत.'
- काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले, 'मोदी सरकार इनकम टॅक्स विभागाला हाताशी धरुन त्यांचा वापर करत आहे. एक दिवस सरकारच्या पापाचा घडा भरेल आणि त्या दिवशी भाजपला दोन थेंब पाणी टाकणारेही कोणी भेटणार नाही.'
- काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, 'हा छापा लोकशाहीची हत्या आहे. अशा छापेमारीने काँग्रेस घाबरणार नाही. सत्य काय आहे ते सर्वांसमोर येईल. भाजपने राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी राजकारणाचा स्तर अतिशय खाली नेला आहे.'
- यावर भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव म्हणाले हा काँग्रेसचा वेडेपणा आहे. 

काय आहे गुजरात आमदारांचे प्रकरण
- गुजरातमध्ये राज्यसभेच्या 3 जागांसाठी 8 ऑगस्टला मतदान आहे. भाजपने या तिन्ही जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपकडून अमित शहा, स्मृती इराणी आणि बलवंत सिंह राजपूत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजपूत हे काँग्रेसमध्ये होते. त्यांनी गेल्या गुरुवारीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. या ठिकाणी काँग्रेसने अहमद पटेल यांना उमेदवारी दिली आहे. 
- गुजरात विधानसभेतील आमदारांना फोडून भाजप तिसरी जागा पटकवण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे अहमद पटेल यांचा राज्यसभेचा मार्ग अवघड होऊ शकतो. पटेल यांना राज्यसभेवर जाण्यासाठी गुजरातमधील 46 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. गुजरात विधानसभेत काँग्रेसचे 54 आमदार होते, त्यातील 7 सदस्यांनी शंकरसिंह वाघेलांसोबत पक्ष सोडला. आता काँग्रेसमध्ये 47 आमदार आहेत. 
- फोडाफोडीचे राजकारण होऊन काँग्रेसला त्यांची राज्यसभेतील एक निश्चित जागाही गमाववी लागेल, यामुळे त्यांनी आपल्या आमदारांना कर्नाटकच्या सहलीवर पाठवले आहे. 
- राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसच्या 11 आमदारांनी क्रॉस वोटिंग केले होते, यामुळे पक्षाने आधीच खबरदारी घेतली. हे आमदार कर्नाटकमध्ये ज्या रिसॉर्टवर थांबले आहेत, त्याच ठिकाणी आयटीचे छापे पडल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. 
 
 
हेही वाचा... 
बातम्या आणखी आहेत...