आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीत सध्याप्रमाणेच राहतील कर दर : अर्थमंत्री अरुण जेटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) दर आश्चर्यकारक नसतील. सध्या एखाद्या वस्तूवर किंवा सेवेवर केंद्र तसेच राज्याचा मिळून जितका कर लागतो, तितकाच कर या नव्या व्यवस्थेमध्ये लागणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी सांगितले. उद्योग संघटना सीआयआयच्या वार्षिक बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. “करावर कर’ ही प्रणाली जीएसटीमध्ये संपणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचा फायदा कंपन्यांनी ग्राहकांना देण्याचे आवाहनही त्यांनी केले.  जेटली यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेची पुढील बैठक १८ ते १९ मेदरम्यान श्रीनगरमध्ये होणार आहे. या बैठकीमध्ये विविध वस्तू आणि सेवांवर दराच्या कोणत्या टप्प्यात कर ठेवण्यात यावा याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या नव्या कर प्रणालीसंबंधित सर्व नियम निश्चित झाले असल्याचे जेटली यांनी सांगितले. अाता परिषदेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचेही ते म्हणाले. इतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनीदेखील जीएसटी नियमांवर सहमती दर्शवली अाहे. त्यामुळे आतापर्यंतचे सर्व निर्णय एकमताने झाले असून मतदान घेण्याची वेळ आली नसल्याचे त्यांनी सांगितले. 
 
सध्या वस्तू आणि सेवांवर केंद्र आणि राज्याचा मिळून किती कर लागतो, जीएसटीमध्येही जवळपास तितकाच कर लागेल. जीएसटी परिषदेने कराचे चार टप्पे निश्चित केले आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...