आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST : आता एका क्लिकवर जाणून घेता येणार दर; सरकारने केले मोबाईल अॅप लॉन्च

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरकारने स्पष्ट केले आहे की विनापरवानगी अधिकाऱ्यांना व्यापाऱ्याकडे जाण्याचा अधिकार नाही. - Divya Marathi
सरकारने स्पष्ट केले आहे की विनापरवानगी अधिकाऱ्यांना व्यापाऱ्याकडे जाण्याचा अधिकार नाही.
नवी दिल्ली-  GST दर एका क्लिकवर जाणून घेता यावेत यासाठी सरकारने एक मोबाईल अॅप लॉन्च केले आहे.  GST लागू करण्यात आल्यानंतर गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात सरकारने आपला दृष्टीकोनही स्पष्ट केला आहे. अर्थमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका वक्तव्यात म्हटले आहे की, विना परवानगी अधिकारी व्यापाऱ्यांकडे जाऊ शकत नाहीत. त्यासाठी एक हेल्पलाइनही सुरु करण्यात आली आहे. यावर तक्रार करता येणार आहे.
 
अर्थमंत्रालयाने जारी केले स्पष्टीकरण
- काही दिवसांपूर्वी काही लोकांनी जीएसटी अधिकारी असल्याचे सांगत व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अर्थमंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे.
- दिल्ली विभागाच्या जीएसटी आयुक्तांनी स्पष्ट सांगितले की, जीएसटी लागू झाल्यावर ही प्रक्रिया अधिकाधिक सुलभ बनविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 
 
अडचण आल्यास या क्रमांकावर साधा संपर्क
- अर्थमंत्रालयाने म्हटले आहे की, कोणत्याही अधिकाऱ्याला व्यापाऱ्यांकडे जाण्याची परवानगी देण्यात आलेली ऩाही. काही अडचण आल्यास 011-23370115 या क्रमांकावर तक्रार करता येऊ शकतो. 
 
अॅपही केले लॉन्च
- अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी ‘जीएसटी रेट्स फाइंडर’ हे मोबाईल अॅपही लॉन्च केले आहे.
- हे मोबाईल अॅप अँन्डॉइड प्लेटफॉर्मवर उपलब्ध आहे. यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांसाठी असलेल्या जीएसटी दरांची माहिती होईल. हे कोणत्याही स्मार्टफोनवर डाऊनलोड करता येणार आहे. हे अॅप ऑफलाइन वापरता येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...