आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीसीएस कर्मचाऱ्यांना वन-टाइम २६०० कोटी बोनस देणार, ३.१८ लाख लाभार्थी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीसीएस ही देशातील सर्वांत मोठी आयटी कंपनी आपल्या जगभरातील ३.१८ लाख कर्मचा-यांना २,६२८ कोटी रुपयांचा वन-टाइम बोनस देणार आहे. टीसीएस आयपीओ आल्याच्या घटनेला यावर्षी १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त बोनस देण्याचा निर्णय झाला आहे. कंपनीचा पहिला आयपीओ ऑगस्ट २०१४ मध्ये आला होता. टीसीएसचे सीईओ आणि एमडी एन. चंद्रशेखरन यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

नफ्यात २७ टक्के घट, तरीही बोनस : टीसीएस टाटा समूहाची कंपनी आहे. समूहाच्या एकूण नफ्यात टीसीएसचा ६० टक्के वाटा आहे. बोनस दिल्याने यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) कंपनीच्या नफ्यात २७ टक्के घट झाली आहे. या तिमाहीत ३,८५८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात कंपनीने ५,२९७ कोटी रुपये कमावले होते.

कर्मचाऱ्यांनीच कंपनीला देशातील सर्वांत मोठी कंपनी बनवली आहे. ग्राहकांना चांगली सेवा देणे आणि नवीन उपक्रम यात कंपनी जगात अव्वल आहे. त्यामुळे कंपनीनेही नफ्याचा फायदा कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला असल्याचे टीसीएसचे एमडी आणि सीईओ एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले.

बोनससाठी दोन नियम
- ज्या कर्मचाऱ्यांनी किमान एक वर्ष पूर्ण केले आहे त्यांनाच बोनस.
- कर्मचाऱ्याने टीसीएसमध्ये जेवढी वर्षे नोकरी केली तेवढ्या आठवड्यांच्या वेतनाएवढा बोनस मिळेल.