आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने राज्यातील ३१ शिक्षक सन्मानित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील ३१ शिक्षकांना सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विज्ञान भवनात झालेल्या या साेहळ्यात केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, उच्च शिक्षण राज्यमंत्री डॉ. महेंद्र पांडे, शालेय शिक्षण राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, शालेय शिक्षण सचिव सुभाष चंद्र खुटिया उपस्थित होते. देशभरातील एकूण ३४६ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र, ५० हजार रुपये असे हाेते. महाराष्ट्रातील एकूण ३१ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये २० प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक हे विशेष श्रेणीचे आहेत. माध्यमिक शिक्षकांपैकी शिक्षक हे विशेष श्रेणीचे आहेत. तर ऍटोमिक एनर्जी एज्युकेशन साेसायटीचे अाहेत.
विभागवारपुरस्कार असे : पश्चिम महाराष्ट्र : शर्मिलापवार सांगली , संभाजी पाटील- काेल्हापूर, दत्तात्रय वारे शिरूर, सुदाम हाेलमुखे- सांगली, अनिल माेहिते- सांगली, हनुमंत जाधव बारामती, संजीव चाैगुले- सांगली, साेमनाथ मेहत्रे पुणे, श्रीमती विमल चाैगुले काेल्हापूर, दत्तु साेनवणे पुणे, बाळासाहेब वाघ साेलापूर, सुहास शिंत्रे काेल्हापूर, संदीप अढाव शिरूर, शिवाजी कळने-पुणे, पांडुरंग संकपाळ- काेल्हापूर, महामुनी मुरलीधर सातारा, विठ्ठल भाेर राजगुरुनगर, श्रीमती समिता पाटील सांगली, अर्जुन सुलगेकर हवेली.
काेकण: रचेलइराणी मुंबई, संजीव माेहता- ठाणे, बीएसके राजु- मुंबई, श्रीमती डॉली गवीन - मुंबई, निवास शेवाळे - मुंबई, श्रीमती लाेबाे रॉनी - मुंबई, नरेंद्र पाठक मुंबई.
मराठवाडा: श्रावणजाधव- जालना, माधव वायचळ हिंगाेली
उत्तरमहाराष्ट्र : नामदेवधामणे अहमदनगर, मच्छिंद्रनाथ पाटील- (चाेपडा) जळगाव
विदर्भ: सुधाकरमडावी चंद्रपूर.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना जालना जिल्ह्यातील शिक्षक श्रावण जाधव.
बातम्या आणखी आहेत...