आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक पुरस्कारात प. महाराष्ट्रावर मेहेरनजर; 31 पैकी 19 पुरस्कार पुणे विभागाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते साेमवारी देशभरातील ३४६ शिक्षकांना राष्ट्रीय अादर्श शिक्षक पुरस्कार देऊन गाैरवले जाणार अाहे. त्यात महाराष्ट्रातील ३१ शिक्षकांचा समावेश अाहे. या ३१ जणांमध्ये केंद्रीय मनुष्यबळ िवकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या पुणे विभागातील १९ जणांचा समावेश अाहे. पुणे-मुंबई वगळले, तर अन्य विभागांना प्रत्येकी एक-दोन पुरस्कारांवर समाधान मानावे लागले अाहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री महाराष्ट्रातील असल्याने पुरस्कार घाेषित करताना महाराष्ट्रावर मेहेरनजर ठेवण्यात अाली अाहे. सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्राला दिले जात अाहेत. त्यापाठाेपाठ उत्तर प्रदेशचा (३०) क्रमांक लागताे. त्यानंतर तामिळनाडू (२३), प. बंगाल (२२), राजस्थान केरळ (१४), गुजरात मध्य प्रदेश (१३), अाेडिशा (१२), अांध्र प्रदेश (९), बिहार (८), अासाम, तेलंगणा उत्तराखंड (७), छत्तीसगड (६) यांचा क्रमांक आहे. इतर राज्यांना ते पुरस्कार जाहीर झाले. दिल्लीत फक्त शिक्षकांना सन्मान मिळणार अाहे.

महाराष्ट्रात केंद्रीय पुरस्कार जाहीर हाेताना प्रादेशिक भेद करण्यात अाल्याचे स्पष्ट झाले अाहे. पुणे शहर अाणि जिल्ह्यात सर्वाधिक पुरस्कार जाहीर झाले अाहेत. विभागनिहाय पुरस्कार असे...

पश्चि ममहाराष्ट्र : १९.नावे अशी : शर्मिला पवार : सांगली, संभाजी पाटील : काेल्हापूर, दत्तात्रय वारे : शिरूर, सुदाम हाेलमुखे : सांगली, अनिल माेहिते : सांगली, हनुमंत जाधव : बारामती, संजीव चाैगुले : सांगली, साेमनाथ मेहत्रे : पुणे, विमल चाैगुले : काेल्हापूर, दत्तू साेनवणे : पुणे, बाळासाहेब वाघ : साेलापूर, सुहास शिंत्रे : काेल्हापूर, संदीप अढाव : शिरूर, शिवाजी कळणे : पुणे, पांडुरंग संकपाळ : काेल्हापूर, मुरलीधर महामुनी : सातारा, विठ्ठल भाेर : राजगुरुनगर, समिता पाटील : सांगली, अर्जुन सुलगेकर : हवेली.

काेकण विभाग (७) : रचेलइराणी : मुंबई, संजीव मेहता : ठाणे, बी. एस. के. राजू : मुंबई, डॉली गवीन : मुंबई, निवास शेवाळे : मुंबई, लाेबाे रॉनी : मुंबई, नरेंद्र पाठक : मुंबई.
इतरविभागांतील शिक्षक असे : श्रावणजाधव : जालना, माधव वायचळ : हिंगाेली, नामदेव धामणे : अहमदनगर, मच्छिंद्रनाथ पाटील : (चाेपडा) जळगाव, अाणि सुधाकर मडावी : चंद्रपूर.

भाजपची रणनीती
देशात सर्वाधिक पुरस्कार पश्चिम महाराष्ट्राला देण्यात अाले अाहेत. कारण या भागात भाजप मजबूत करणे हे अाहे. अादर्शवादाच्या गप्पा केल्या तरी सत्य लपत नाही. आधी स्मार्ट सिटी पुणे अाणि साेलापूरलाच केंद्राने घाेषित करणे हा भाजपच्या रणनीतीचाच भाग अाहे.
-जम्मू अानंद, अाम अादमी पक्षाचे नेते
बातम्या आणखी आहेत...