छायाचित्र - दिल्लीतील समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना औरंगाबाद जिल्ह्यातील सिंदोन-भिंदोन शाळेच्या शिक्षिका संगीता चव्हाण.
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील २८ जणांसह देशभरातील ३४५ शिक्षकांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रमाणपत्र, रजतपदक आणि २५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र राज्यातील २७ शिक्षकांना प्राथमिक शिक्षक गट, विशेष श्रेणी (प्राथमिक) गट, माध्यमिक विद्यालय शिक्षक गट व विशेष श्रेणी (माध्यमिक) अशा विभागात
पुरस्कृत करण्यात आले अाहे. यािशवाय राज्यातील केंद्रीय व नवोदय विद्यालयाच्या तीन शिक्षकांचाही राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. िदल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या या पुरस्कार िवतरण सोहळ्याला मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती झुबेन इराणी यांची
उपस्थिती होती.
संगीता भिकनराव चव्हाण
सहशिक्षका, जि.प. शाळा, सिंदोन, जि. औरंगाबाद.
प्रकाश लक्ष्मण गरड
फिरोदिया प्रशाला नवीपेठ, जि. अहमदनगर.
संभाजी आलेवाड
मुख्याध्यापक, जि.प. शाळा, लोहा, जि. नांदेड.
लक्ष्मण देवराव साखरे
मुख्याध्यापक जि.प. शाळा सावली, जि. परभणी.