आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘गुरू उत्सवा’वरून गदारोळ; प्रक्षेपण बंधनकारक नाही, स्मृती इराणींचे स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी देशभरात साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनावरून यंदा राजकीय वातावरण तापले आहे. शुक्रवारी शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील विद्यार्थ्यांना भाषण देणार आहेत तसेच हा दिवस गुरू उत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली आहे.

केंद्राच्या मते, पंतप्रधान देशभरातील मुलांशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ असेल. मात्र केंद्राच्या या दोन्ही निर्णयावर काँग्रेसचा आरोप आहे की, मोदी सरकारने केवळ पॅकेजिंग बदलले आहे. शिक्षक दिनानिमित्त काँग्रेसने केलेले प्रयोगच पुन्हा अंमलात आणले जात आहेत.
मोदींचे भाषण अनिवार्य होते : मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार, ५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान दिल्लीतील एक हजार मुलांसमोर दुपारी भाषण देतील. याचे थेट प्रक्षेपण देशातील १८ लाख शाळांमध्ये दाखवणे अनिवार्य असेल.

...यांनी आक्षेप घेतला : काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले, ‘पंतप्रधानांना मौलिक ज्ञान मुलांना द्यायचे असल्यास हे भाषण शाळेच्या वेळेतच व्हावे.’ प.बंगालचे शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी म्हणाले, ‘आमच्याकडे या कार्यक्रमाच्या तयारीसाठी वेळच नाही.’ इतर राज्यांच्या मते, या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचा खर्च केंद्र सरकारने करावा.

प्रक्षेपण बंधनकारक नाही
कार्यक्रमावरून झालेल्या टीकांनंतर मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, ‘हा राजकीय निर्णय नाही. तसेच कार्यक्रमाचे प्रक्षेपण कोणत्याही शाळेला बंधनकारक नाही. प्रक्षेपण करावे अथवा नाही, हा ऐच्छिक विषय आहे. स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानांना मुलांशी बोलण्याचे स्वातंत्र्य नाही का? ’