आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Teachers\' Day: PM Modi Address Students Across The Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांना भाषण ऐकवण्यासाठी 1.26 अब्ज कोटींचा खर्च, शाळांकडून अहवाल मागवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाच्या इतिहासात प्रथमच शिक्षक दिनी पंतप्रधान शालेय विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. शुक्रवारी देशातील 1.80 लाख सरकारी आणि खासगी शाळांमध्ये पीएम नरेंद्र मोदींचे भाषण दाखवले जाणार आहे. त्यासाठी मुलांना लाइव्ह भाषण दाखवण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले होते. प्रत्येक शाळेसाठी यावर सुमारे 7 हजार रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे एकूण 1 अब्ज 26 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

भाषण ऐकले की नाही पुरावे
हा कार्यक्रम अनिवार्य नसल्याचे मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र कार्यक्रम मुलांना दाखवला की नाही हे तपासले जाणार असल्याचे केंद्राने जारी केलेल्या सर्कुलरमध्ये म्हटले आहे. त्याचे पुरावे म्हणून फोटोही घेतले जाणार आहेत. किती मुलांनी हे भाषण ऐकले आणि किती वेळ ऐकले याचा अहवाल शाळांना पाठवावा लागणार आहे.

शाळेच्या वार्षिक अनुदानातून भरपाई
पंतप्रधानांचे भाषण दाखवण्याचा खर्च प्राथमिक, ज्युनिअर आणि माध्यमिक शाळांना दरवर्षी दिल्या जाणा-या अनुदानातून वसूल केला जाणार आहे. अनुदानाची रक्कम आवश्यक त्या सुविधांवर खर्च करायची असते.

शाळांना आदेश - मोबाइलवर भाषण ऐकवा
अनेक राज्यांच्या शिक्षण विभागाने सर्व सरकारी आणि खासगी शाळांना टीव्ही नसल्यास रेडिओ आणि रेडिओ नसल्यास मोबाइलवर भाषण ऐकवण्याचा आदेश दिला आहे. तसेच वीज नसल्यास जनरेटर अथवा इनव्हर्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये पुरामुळे अडथळा
जम्मू-काश्मीर मध्ये मुलांना मोदींचे भाषण ऐकता येणार नाही. राज्यात निर्माण झालेली पूरस्थितीत आणि जोरदार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली आहेत. सर्व शाळांना सुट्या घोषित करण्यात आल्या आहेत.