आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Teaching Not A Profession, A Way Of Life: Narendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षक पेशा नव्हे, जीवनधर्म; काळानुसार पिढी घडवा : नरेंद्र मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. शिक्षक हा पेशा नव्हे, तर तो जीवनधर्म आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी शिक्षकांना संबोधित केले. आपल्या शाळेतील शिक्षक आणि वर्गमित्रांना बोलावण्याची माझी बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा होती. गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्या सर्वांना घरी बोलावले होते, अशी आठवणही मोदी यांनी सांगितली.

शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शुक्रवारी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात येणाऱ्या ३५० शिक्षकांसमोर मोदी बोलत होते. विज्ञान भवनात झालेल्या या कार्यक्रमात सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतानाच मोदींनी त्यांना देशाचे भवितव्य आणि विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

नवी पिढी घडवून त्यांच्यात बदलासाठी ऊर्मी निर्माण करा
शिक्षकही एक जीवनपद्धती आहे. तो एक जीवनधर्म आहे. त्याला पेशा किंवा नोकरी असे म्हटले जाऊ नये. कोणताही शिक्षक कधीही सेवानिवृत्त होत नसतो. नव्या पिढीला सुशिक्षित करण्यासाठी तो नेहमीच तत्पर असतो, प्रयत्नरत असतो. समाजाची प्रगती साधायची असेल तर शिक्षकांनी नेहमीच काळाच्या दोन पावले पुढे असले पाहिजे. जगात कोणते बदल होत आहेत हे त्यांनी समजून घ्यावे. नवीन पिढीत या बदलांबाबत मोठी उत्सुकता असते. त्यादृष्टीने शिक्षकांनी नव्या पिढीला घडवावे. बदलासाठी त्यांच्यात ऊर्मी निर्माण करण्याचे काम शिक्षकाचे आहे, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केले.