नवी दिल्ली/सेंटा क्लारा- आठव्या वर्गात शिकणारा 13 वर्षीय शुभम बॅनर्जी याने कॅलिफोर्नियात स्वत:ची कंपनी सुरु केली आहे. शुभमने कमी किमतीत ब्रेल प्रिंटरसह दृष्टिहीन लोकांसाठी स्पर्श करून लिहिता येणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये उद्योगपती बनण्यासाठी आता वयाची कोणतीच मर्यादा नसल्याचे शुभमने दाखवून दिले आहे.
बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रेल प्रिंटरची किंमत जवळपास सव्वा लाख रुपये आहे. ही किंमत मध्यम वर्गीयांच्या अवाक्याबाहेर आहे. यामुळे गेल्या वर्षी शुभमने शाळेतील 'सायन्स प्रोजेक्ट'साठी लेगो रोबोटिक किट युक्त ब्रेल प्रिंटर डेव्हलप केले होते. या शानदार कामगिरीबद्दल त्याचे गोडकौतुकही झाले. दृष्टिहीनांच्या आयुष्यात आशेचा 'किरण' निर्माण करणार्या शुभमने
आपली स्वत:ची 'ब्रेगो लॅब्स कंपनी उघडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे 'इंटेल'चे अधिकारीदेखील शुभमने तयार केलेले 'प्रिंटर' बघून अवाक् झाले होते. त्यामुळे इंटेलने शुभमच्या कंपनीत मोठी गुंतवणूक केली.
सगळ्यात स्वस्त 'ब्रेल प्रिंटर'ची निर्मिती करणार...
सगळ्यात स्वस्त ब्रेल प्रिंटरची निर्मिती करण्याची शुभमची मनिषा आहे. प्रिंटर वजनाने हलके असून त्याची किंमत 21,594 रुपयांपर्यंत असेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्रिंटरचे वजन जवळपास 9 किलो आहे. प्रिंटरच्या मदतीने दृष्टीहीन व्यक्ती ब्रेल रीडिंग मटेरियलचा वापर करून प्रिंट करू शकतील. या प्रिंटरमध्ये शाई ऐवजी डॉट्स वापरले जातात.
शुभमला आई-वडील करताय मदत...
शुभमच्या कंपनीत सध्या 10 कोर मेंबर आहेत. त्यात शुभमच्या आई-वडीलांचा समावेश आहे. कोर मेंबर शुभमला वेळोवेळी सहकार्य करतात. शुभमचे वडील निलॉय बेनर्जी हे आर्थिक सल्लागाराची भूमिका बजावतात. तर आई कायदेविषयक सल्लागार आहे. शुभमच्या आईने दिल्लीतील वायएमसीए महाविद्यालयातून एमबीए केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, शुभम बॅनर्जीचे फोटो...