आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधीचा दुरुपयोग केल्याप्रकरणी सेटलवाड यांची अटक टळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुजरात दंगलग्रस्तांसाठी जमा करण्यात आलेल्या निधीचा दुरुपयोग केल्याप्रकरणी अटकेच्या टांगत्या तलवारीतून सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना दिलासा मिळाला आहे.गुजरात उच्च न्यायालयाने सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद यांची अग्रीम जामीन याचिका फेटाळून लावली होती.
त्यामुळे गुरुवारी त्यांना अटक होणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला शुक्रवारपर्यंत स्थगिती दिली आहे.२००२ मध्ये गुजरातेत उसळलेल्या दंगलीतील पीडितांसाठी गोळा करण्यात आलेल्या निधीतून १ कोटी ५१ लाख रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप सेटलवाड आणि त्यांच्या पतीवर आहे.