आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tehelka Printed Balasaheb Thackeray\'s Photo With Dawood And Yakub

नवा तहलका : मासिकाच्या कव्हरवर दहशतवाद्यांच्या रांगेत बाळासाहेबांचा फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तहलका मासिकाच्या हिंदी कव्हरवर याकूबबरोबर लावलेला बाळासाहेबांचा फोटो. - Divya Marathi
तहलका मासिकाच्या हिंदी कव्हरवर याकूबबरोबर लावलेला बाळासाहेबांचा फोटो.
खळबळजनक खुलाशांसाठी प्रसिद्ध असलेल्या तहलकाने यावेळी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. तहलकाच्या नव्या अंकाच्या मुखपृष्ठावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना थेट दहशतवाद्यांच्या रांगेत बसवण्यात आले आहेत. कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम आणि याकूब मेमन यांच्या फोटोबरोबर बाळासाहेबांचा फोटोही लावण्यात आला आहेत. या कव्हरपेजवर 'खरा दहशतवादी कोण?' अशा आशयाचा मजकूर छापण्यात आला आहे.
१९९३ मध्ये झालेल्या मुंबई साखळी स्फोटातील आरोपांप्रकरणी याकूब मेमनला नुकतीच फाशी देण्यात आली. या मुद्याला धरूनच या मासिकामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तहलकाच्या १५ ऑगस्टच्या या अंकामध्ये भारतात आरोपीला शिक्षा देण्याबाबत पक्षपात केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी याकूब मेमनला गुन्हा कबूल केल्यानंतरही फाशी देण्यात आली. पण त्याउलट बाळासाहेब ठाकरेंवर आरोप असूनही मृत्यूनंतर शासकीय इतमातात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यावरील आरोप सिद्धही होऊ शकले नाही. अशा प्रकारच्या मुद्यांद्वारे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

तहलकाच्या इंग्रजी कव्हरवर बाळासाहेबांचा फोटो दाऊद, याकूब आणि भिंदरानवाले यांच्याबरोबर वापरण्यात आला आहे. तर हिंदी पोस्टरमध्ये केवळ बाळासाहेब ठाकरे आणि याकूब मेमन यांचे फोटो छापण्यात आले आहेत. या दोन्हींवर सर्वात मोठा दहशतवादी कोण अशा आशयाचा प्रश्न विचारण्यात आला आहे.
मनसे आक्रमक शिवसेना शांत
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकाराविरोधात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पोलिसांतस तक्रार दाखल केली आहे. हा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असून त्याविरोधात कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शिवसेनेने मात्र याबाबत संयमी भूमिका घेतल्याचे समजते आहे. सामाजिक सलोख्याला तडा जाऊ नये म्हणून संयमाने याबाबत माहिती घेत असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
औरंगाबादमध्‍येही गुन्‍हा दाखल
औरंगाबादमधील क्रांती चौक पोलिस ठाण्यात तहेलका मासिकाविरोधात, शिवसेनेचे शहरप्रमुख अंबादास दानवेंच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्‍यात आला