आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभेत मिरची पूड, स्प्रे फवारणे, चाकूचा धाक दाखवणे भोवले, 17 खासदार निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकसभेत गुरुवारी एक असंसदीय घटना घडली. स्वतंत्र तेलंगणाचे विधेयक मांडल्यानंतर एका खासदाराने अज्ञात स्प्रे फवारला व मिरची पूड फेकली. त्यानंतर लगेच लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांच्यासह अनेक खासदारांना खोकला व डोळ्यांची जळजळ होऊ लागली. अनेकांना चक्कर आली तर अनेकांची प्रकृती बिघडली. त्यामुळे तत्काळ या खासदारांना रूग्णालयात दाखल करावे लागले. याचबरोबर मीरा कुमार यांनी लोकसभेचे कामाकाज तासाभरासाठी तहकूब केले. या घटनाक्रमांबाबत काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी संबंधित खासदाराने चाकूही होता. तसेच ते सर्व खासदारांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. संबंधित खासदारांवर सरकार कडक कारवाई करेल.
लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांनी 17 खासदारांना निलंबित केले आहे. यात एल. राजगोपाल, एम. वेणूगोपाल आणि जगनमोहन रेड्डी यांचा समावेश आहे. या सर्व खासदारांना पाच दिवसासाठी निलंबित केले आहे.
लोकसभेत उपस्थित असलेल्या खासदारांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंबित खासदार एल. राजगोपाल यांनी मिरचीपूड व स्प्रेची फवारणी केली. त्यामुळे मीरा कुमार यांच्यासह अनेक खासदारांना त्रास होऊ लागला. त्यापूर्वी तेलंगणा समर्थक व विरोधक खासदारांमध्ये लोकसभेतील वेलमध्येच जोरदार बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर मारामारीत झाले. यात दोन खासदार जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तेलंगणा प्रांताला स्वतंत्र राज्याच्या दर्जा देण्याची मागणी करणारे विधेयक लोकसभेत सादर केले. त्यानंतर संसदेत अभूतपूर्व गदारोळ सुरु झाला. खासदारांनी सचिवाचे काचेचे टेबल, माईकची मोडतोड केली आहे.
पुढे वाचा, कोण आहे मिरचीपूड व स्प्रे फवरणारा खासदार...