आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Telangana Bill News In Marathi, Delhi, Rajyasabha, Divyamarathi

राज्यसभेत सादर झाले नाही \'तेलंगणा\'; \'तेलगू देसम\'च्या खासदारांची महासचिवांना धक्काबुक्की

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मुद्यावरून आज (बुधवारी) राज्यसभेतही प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेत मंगळवारी बंद द्वार तेलंगणा विधेयक मंजूर करण्‍यात आले होते. तेलगू देसम पक्षाचे खासदार सी. एम. रमेश यांनी राज्यसभेचे महासचिव शमशेर शेरीफ यांना धक्काबुक्की केली. एवढेच नाही तर त्याच्या हातातील कागदपत्रेही ओढण्याचा प्रयत्न केला. त्यात शेरीफ यांचा चश्मा खाली पडला. त्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले. आज दिवसभर चाललेल्या गदारोळामुळे राज्‍यसभेत तेलंगणा विधेयक सादर होऊ शकले नाही. कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब करण्‍यात आले.

सीमांध्र भागातील खासदारांनी मंगळवारी लोकसभेत तेलगंणा विधेयकला विरोध केला होता. सभापतींनी खासदारांना शांतता राखण्याने अनेकदा आवाहन केले. परंतु, खासदार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

पंतप्रधानांनी घेतली भाजप नेत्यांची भेट...
तेलंगणा विधेयकाच्या मुद्यावरून देशाचे पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली. तेलंगणा विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्‍यासाठी सहकार्य करण्याचे मनमोहनसिंह यांनी त्यांना आवाहन केले. या बैठकीत भाजन नेता व्यंकया नायडू, अरुण जेटली आणि गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, जयराम रमेश, अहमद पटेल उपस्थित होते.