आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलगंणा : राज्यसभेत गोंधळ, दुपारी दोनपर्यंत कामकाज तहकूब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तेलंगणाचे विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आल्यानंतर ते राज्यसभेत मांडण्यात आले आहे. यावर चर्चा सुरु आहे. मात्र तेलगंणाविरोधक समर्थकांनी राज्यसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. दुपारी दोनपर्यंत कामकाज पुन्हा सुरु होईल व तसेच राज्यसभेचेही तेलंगणाच्या विधेयकावर आज मोहर उमटेल अशी चिन्हे दिसत आहेत.
मंगळवारचा 1 तास 25 मिनिटांचा अवधी संसदेच्या इतिहासात कधीही न विसरता येणारा ठरला. तेलंगणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले, पण सरकार नापास झाले. कारण, विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारने लोकशाहीची तत्त्वेच पायदळी तुडवली. संसदेच्या आत व बाहेर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले. संसदेकडे जाणार्‍या रस्त्यांवरही ओळखपत्रांविना प्रवेश नव्हता. परिसरात गुप्तचर संस्थांचे अधिकारी तैनात होते. चर्चा व मतदानाचे थेट प्रसारणही थांबवण्यात आले. बहाणा केला तांत्रिक बिघाडाचा. पडद्यामागे भाजप-काँग्रेस एकत्र असल्याचे चित्र होते. उर्वरित विरोधी पक्षांनी मात्र याला काळा दिवस संबोधले. दुपारी 3 ते 4.25 दरम्यान हे नाट्य घडले. ना चर्चा, ना मतदान. थेट 38 दुरुस्त्यांसह विधेयक मंजूर! आता बुधवारी ते राज्यसभेत सादर होऊ शकते.
विरोध आणि पाठिंब्याचे गणित
सर्वच पक्षांचा डोळा निवडणुकांवर- काँग्रेसचा डोळा तेलंगणाच्या 17 लोकसभा जागांवर आहे. तेलंगणासाठी आंदोलन करणारी टीआरएस काँग्रेसमध्ये जाईल. यामुळे पक्षाला या जागा मिळतील, अशी आशा काँग्रेसला आहे.जगन-चंद्राबाबू यांचा डोळा उर्वरित 25 जागांवर आहे. कारण त्यांना तेलंगणात काही मिळणार नाही. यामुळे उर्वरित आंध्र हातात यावा म्हणून दोन्ही पक्ष जोर लावून विरोध करत आहेत. भाजप ना तेलंगणा, वा उर्वरित आंध्रात नाही. मात्र त्यांचाही डोळा 42 जागा असलेल्या या भागावर आहे. म्हणूनच ते कधी तेलंगणाला पाठिंबा देतात, कधी सीमांध्रची काळजी करतात.
खासदारच कमांडो- गृहमंत्र्यांनी विधेयकावर चर्चा सुरू केली तेव्हा सपा, सीमांध्र खासदार व मंत्री वेलमध्ये आले. सोनियांनी अगोदरच आपल्या खासदारांना निरोप पाठवला होता. त्यानुसार शिंदेंभोवती काँग्रेस खासदारांनी कडे केले. एक प्रकारे खासदारच कमांडो झाले.
राजीनामा सत्र : केंद्रीय मंत्री पुरंदेश्वरी यांनी राजीनामा देत पक्षही सोडला. आंध्रचे 4 मंत्री, अनेक आमदारांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्री रेड्डीही उद्या राजीनामा देऊन नव्या पक्षाची स्थापना करू शकतात.
काँग्रेसची पडद्यामागे अशी खेळी- आंध्रच्या कायदामंत्र्यांच्या दाव्यानुसार बुधवारी मुख्यमंत्री किरण रेड्डी राजीनामा देऊन नवा पक्ष स्थापतील. प्रत्यक्षात काँग्रेसची खेळी वेगळी आहे. तेलंगणाच्या जागा मिळणारच आहेत, पण रेड्डींचा पर्यायही खुला ठेवावा. रेड्डी तेलंगणाविरोधक असल्याने ते काही जागा जिंकतील. नंतर त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेता येईल.
हे आहेत तेलंगणा समर्थक- काँग्रेस, भाजप, बसपा, भाकप आणि टीआरएस
लोकसंख्येच्या प्रमाणात
तेलंगणा : 3,51,93,978
उर्वरित आंध्र : 4,94,61,553
लोकसभेत
तेलंगणा 17 जागा
उर्व. आंध्र 25 जागा
विधानसभेत
119 जागा
175 जागा
हे आहेत संयुक्त आंध्रचे समर्थक
सीमांध्रचे काँग्रेस खासदार, वायएसआर काँग्रेस, सपा,
माकप, जदयू, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना
29 वे राज्य 3 पावलांवर
०विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडले जाऊ शकते. ०राज्यसभेत मंजुरीनंतर ते राष्ट्रपतींकडे जाईल. विधेयक रोखण्याचा हक्क असला तरी ते स्वाक्षरी करतीलच. ०यानंतर अधिसूचना जारी होऊन 29 वे राज्य अस्तित्वात येईल.

पुढील स्लाइडमध्ये, तेलंगणा समर्थकांचा आनंदोत्सव होळी आणि दिवाळीही