आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Telangana Bill Submitted In RajyaSabha; Kamalnath

तेलंगणावर राज्यसभेचीही मोहोर; राष्ट्रपतींच्या हस्ताक्षराने 29 वे राज्य येईल अस्तित्वात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रचंड गदारोळात राज्यसभेत तेलंगण विधेयक मंजूर झाले. दोन दिवसांपूर्वी ते लोकसभेत मंजूर झाले होते. आता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्वाक्षरीची औपचारिकता पूर्ण होताच तेलंगण देशाचे 29वे राज्य म्हणून अस्तित्वात येईल.
राज्यसभेत भाजपने अनेक आक्षेप घेतल्यामुळे ‘आंध्र प्रदेश फेररचना विधेयक 2014’च्या मंजुरीवर संभ्रम होता. मात्र सीमांध्र व भाजपच्या काही मागण्यांनंतर पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आंध्रतून विभाजन होणार्‍या दोन्ही राज्यांसाठी सहा कलमी विकास पॅकेजची घोषणा केली. या अंतर्गत सीमांध्रच्या 13 जिल्ह्यांना विशेष दर्जा देऊन त्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार खर्च करेल. नव्या उद्योगांना करांत सवलत दिली जाईल. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सीमांध्रला पाच वर्षांसाठी विशेष दर्जा देण्याचा आग्रह केला होता.
तेलंगणविरोधात राज्यसभेत शिवसेना व तृणमूलने सीमांध्रच्या खासदारांना साथ दिली. त्यांनी हौद्यात उतरून कागदांचे कपटे भिरकावले. यामुळे पाच तासांच्या चर्चेदरम्यान सातवेळा सभागृह तहकूब झाले.
मराठवाडा, विदर्भ वेगळा करा : पासवान
राज्यसभेत लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख रामविलास पासवान यांनी तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यायचा असेल तर मराठवाडा, विदर्भ, उर्वरित महाराष्ट्रलाही वेगळे राज्य करा, अशी मागणी केली. दुसरीकडे, बसप नेत्या मायावती यांनीही वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पाठिंबा दिला.