आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Telangana Bill To Be Tabled In Winter Session: Sushilkumar Shinde

हिवाळी अधिवेशनात तेलंगणा विधेयक मांडणार, सुशीलकुमार शिंदेंची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- हिवाळी अधिवेशनात तेलंगणा विधेयक मांडले जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज (गुरुवार) दिली. येत्या 5 डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे.
तेलंगणावरून रायलसिमा भागात उग्र आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर तेलंगणा विधेयक संसदेत मांडले जाते, की नाही यासंदर्भात संशयाचे वातावरण तयार झाले होते. त्यावर भूमिका मांडताना सुशीलकुमार शिंदे यांनी विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल, असे स्पष्ट केले आहे.
गेल्या सात दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने आंध्र प्रदेशातील सात राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठिंच्या आदेशानंतर ही चर्चा करण्यात आली होती.