आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Telangana News In Marathi, Chandrasekhar Rao Meets Sonia Gandhi

टीआरएस कॉंग्रेसमध्ये विलिन होणार? चंद्रशेखर राव यांनी घेतली सोनियांची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तेलंगणाला वेगळ्या राज्याच्या दर्जा देण्यासाठी लढणारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) कॉंग्रेसमध्ये विलिन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विलिनिकरण झाले नाही तर दोन्ही पक्ष तेलंगणामध्ये आघाडी करणार असल्याचे समजते. याचाच एक भाग म्हणून तेलंगणा राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव यांनी आज कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.
कॉंग्रेसने तेलंगणाला वेगळ्या राज्याच्या दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने सोनिया गांधी यांचे आभार मानन्यासाठी भेट घेतली, असे चंद्रशेखर राव यांनी सांगितले आहे. कॉंग्रेसचे आंध्र प्रदेश प्रभावी दिग्विजयसिंह माझ्या संपर्कात राहणार आहेत, असेही राव यांनी सांगितले. यावरून उभय नेत्यांमध्ये आगामी निवडणुकांवर सविस्तर चर्चा झाल्याचे दिसून येते. परंतु, अशी कोणतीही चर्चा झाल्याचा राव यांनी इन्कार केला आहे.
तेलंगणामधील कॉंग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. यावेळी केंद्रीय मंत्री सत्यनारायण म्हणाले होते, की तेलंगणा राष्ट्र समिती कॉंग्रेसच्या पाठिशी उभी राहिल, अशी आम्हाला आशा आहे.