आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Telangana Row, Congress Expels Six MPs From Andhra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अविश्वास प्रस्तावाची नोटीस देणा-या सहा खासदारांना काँग्रेसने केल निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसने त्यांच्याच पक्षाच्या सहा खासदारांना निलंबित केले आहे. हे सर्व खासदार आंध्रप्रदेशातील आहेत. त्यांनी तेलंगणा मुद्यावर सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची नोटीस दिली होती.
एस. हरी, जी.व्ही. हर्षकुमार, व्ही. अरुणकुमार, एल. राजगोपाल, आर. संबाशिव राव, ए. साई प्रताप या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
का झाले निलंबन
केंद्र सरकार आंध्र प्रदेशमधून तेलंगणा या नव्या राज्याची निर्मीती करणार आहे. त्याच्याविरोधात हे सहा खासदार आहेत. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने या खासदारांच्या निलंबनाची शिफारस केली आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी ही माहिती माध्यमांना दिली.
तेलंगणा राज्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने गेल्या वर्षीच मंजूर केला होता. आता तो संसदेत मंजूरीसाठी येणार आहे. मात्र, त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी त्याचा विरोध केला आहे. विरोधीपक्षाचे समर्थन मिळविण्यासाठी काँग्रेस शक्य तेवढे प्रयत्न करीत आहे. मंगळवारीच हे विधेयक राज्यसभेत सादर केले जाणार होते. मात्र, यावर पाठिंब्याची शक्यता कमी दिसत असल्याने गुरुवारपर्यंत हा निर्णय यूपीए सरकारने पुढे ढकलला आहे. दरम्यान, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग भाजप नेत्यांना डिनरला बोलावून या विधेयकावर त्यांना समर्थनासाठी राजी करण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कॅबिनेटच्या मंजूरीनंतर या विधेयकाला राष्ट्रपतींचीही मंजूरी मिळालेली आहे. सर्वसाधारण निवडणुकीच्याआधी होत असलेल्या या शेवटच्या अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा मानस आहे. हे अधिवेशन 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

पुढील स्लाइडमध्ये, तेलंगणावरुन सोमवारी संसदेत रणकंदन