आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Telangana State Bill News In Marathi, Divyamarathi

तेलंगणा विधेयक काँग्रेसची कसोटी; संसदेत विधेयक पारित न झाल्यास फटका बसणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्र सरकार संसदेत तेलंगणा विधेयक गोंगाटातच पारित करू शकते. विरोधकांचा अंदाज घेतल्यानंतर सरकार त्यानुरूप धोरण आखण्याची शक्यता आहे. संसदेचे विधेयक आता पारित न झाल्यास अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात त्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. दरम्यान, आंध्रप्रदेश विधानसभेत प्रचंड गोंधळात बुधवारी तेलंगणा निर्मितीचे विधेयक पारित करण्यात आले.

विधेयक मंजूर करून घेण्यासाठी ते घटनादुरुस्तीच्या कक्षेत आणण्याची आवश्यकता नाही, असा सल्ला कायदा मंत्रालयाने दिला आहे. त्याआधी विधेयक राज्यसभेमध्ये सादर केले जाणार होते. मात्र, राज्यसभा सचिवालयाने त्यास वित्त विधेयक ठरवत आक्षेप घेतला होता.

आता ते गुरुवारी लोकसभेत मांडण्यासाठी तयारी सुरू आहे. या प्रकरणाच्या संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर संसदेत सुरक्षा रक्षकांना सतर्क करण्यात आले आहे. खासदारांच्या माध्यमातून प्रवेशाचा पास बनवून घेणार्‍यांवर लक्ष ठेवले जात आहे. संसद कर्मचार्‍यांनी कोणालाही पास देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

काँग्रेसमध्ये संभ्रम
काँग्रेस तेलंगणा विधेयक पारित करू शकली नाही, तर पक्षाला सीमांध्रसोबत तेलंगणामध्येही सपाटून मार खावा लागेल. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आंध्र प्रदेशातील 33 जागांच्या जोरावर 206 आकडा प्राप्त केला होता.