आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Telangana To Be Seprate State And Hyderabad Union Territory

स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्मितीला वेग; \'हैदराबाद\' बनणार केंद्रशासीत प्रदेश?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीबाबत सकारात्मक विचारमंथन पूर्ण झाले असून आता निर्णयाची वेळ आहे, असे दिग्विजयसिंह यांनी म्हटले. या मुद्दय़ावर आंध्रच्या काँग्रेस नेत्यांची शुक्रवारी केंद्रीय नेत्यांसोबत बैठक झाली. बैठकीत दोघांनीही बाजू मांडली. चालू अधिवेशनापूर्वीच निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान मंत्री डॉ.मनमोहन सिंह यांच्या निवासस्थानी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कोअरग्रुपची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात स्वतंत्र तेलंगाणा आणि दिल्या जाणार्‍या आर्थिक पॅकेजवरही चर्चा झाली. दुसरीकडे हैदराबाद शहराला केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा दिला जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनुसार, डॉ. मनमोहन सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डीही उपस्थित होते. तसेच कोअरग्रुपचे अर्थमंत्री पी.चिदंबरम, संरक्षण मंत्री एके एंटोनी, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कॉंग्रेस अध्यक्षांचे राजकीय सचिव अहमद पटेल, गुलाम नबी आजाद, महासचिव दिग्विजय सिंह उपस्थित होते. गृहमंत्री शिंदे यांनी कोअरग्रुपसमोर गृहसचिव अनिल गोस्वामी आणि गुप्तचर संस्थेना तयार केलाला एक अहवाल सादर केला. स्वतंत्र तेलंगाणा झाल्यानंतर राज्याती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही या अहवालात वर्तवण्यात आली. या पार्श्वभूमीवर आंध्रात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याच्या मुद्यावरही चर्चा झाली. कर्नाटकातही अलर्ट जारी केला जाणार असल्याचे संकेत आहेत.

आंध्र प्रदेशात सुरु असलेल्या पंचायत निवडणुका 31 जुलैपर्यंत समाप्त होत आहेत. त्यामुळे या परिस्थिती सरकार कोणताही मोठा निर्ण जाहीर करू शकत नसल्याचेही स्पष्ट करण्‍यात आले.