आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता साध्या मोबाईलने आणि इंटरनेटशिवाय करा बँक खात्याचे सर्व व्यवहार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोबाइल बॅंकिंग आता आणखी सहज आणि सोपे होणार आहे. लवकरच इंटरनेटशिवाय आणि स्मार्टफोन मोबाईलशिवाय केवळ एसएमएसद्वारे फंड ट्रान्सफर, बॅलेंस इन्क्वायरी, पिन नंबर बदलणे, मिनी स्टेटमेंट, चेक बुक रिक्वेस्ट यासारखी कामे केली जाणार आहेत. बहुतेक टेलिकॉम कंपन्या यासाठी तयार झाले आहेत. केंद्र सरकार लवकरच याप्रकारच्या बॅंकिंग सिस्टमची अधिकृत घोषणा करणार आहे.

एसएमएसद्वारे करा बॅंक व्यवहार- अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून 10 टेलिकॉम कंपन्या पेमेंट गेटवे 'नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' म्हणजेच एनपीसीआय सोबत चर्चा करीत आहे. ही सुविधा टेलिकॉम कंपन्यांच्या USSD चॅनेलवरून चालणार आहे. USSD एक प्रॉटोकॉल आहे ज्याद्वारे जीएसएम सेल्युलर टेलिकॉम कंपन्या सर्विस प्रोवायडर कंपन्यांसोबत संचार करते. इस चॅनेलच्या माध्यमातून ग्राहक एका सामान्य टेक्स्ट मॅसेजद्वारे डेबिट आणि क्रेडिट कार्ड ट्रान्जेक्शन करू शकणार आहे. याशिवाय कमी रक्कमेच्या बिलावर पेमेंट करण्याची सुविधा असणार आहे.

टेलिकॉम कंपन्या होत नव्हत्या राजी- एनपीसीआयचे एमडी आणि सीईओ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, 'एसएमएसद्वारे मोबाईल बॅंकिंग' सेवा सुरु करण्याबाबत टेलिकॉम कंपन्या तयार होत नव्हत्या. कंपन्यांना भीती होती की, या मोबाईल बॅंकिंग सिस्टमला USSD चॅनेल दिल्यास त्यांच्या बिजनेसवर नकारात्मक परिणाम होईल. मात्र, यावर सरकारने आर्थिक मदत देण्याची तयारी दाखवल्यानंतर कंपन्यांनी होकार दिला. टेलिकॉम नियामक मंडळा(ट्राय)चे म्हणणे आहे की, या चॅनेलचा ठराविक उपयोग योग्य ठरणार नाही. मोबाईलवरून केलेल्या प्रत्येक व्यवहारामागे सर्विस यूजर्सला दीड रूपया द्यावे लागतील. अखेर हा प्रश्न मिटला असून लवकरच बॅंकेचे ग्राहक साध्या मोबाईलद्वारेही या सुविधाचा लाभ घेऊ शकतात.
पुढे वाचा, भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँकेचे गृहकर्ज स्वस्त...