आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Telecom Regulator Proposes Re 1 Compensation For Call Drop

प्रत्येक कॉल ड्रॉपपोटी एका रुपयाची भरपाई; जारी होणार अधिसूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- फोनवर बोलता बोलता मध्येच कॉल डिसकनेक्ट होण्याच्या (कॉल ड्रॉप) समस्येचा सामना सर्वसामान्यांसह पंतप्रधान कार्यालयालाही करावा लागत आहे. त्यावर दूरसंचार नियामक ट्रायने कठोर पाऊल उचलले आहे. एका दिवसात तीन वेळा कॉल ड्रॉप झाल्यास दंड वसूल करण्यास ट्रायने मंजुरी दिली आहे. दंडाची कमाल रक्कम एक हजार रुपये असू शकते.

दैनिक भास्कर समूहाने सर्वात आधी ११ जूनलाच दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हवाल्याने कॉल ड्रॉपवर दंड वसूल केला जाणार असल्याचे वृत्त दिले होते. याबाबतीत ट्रायचा अहवाल तयार झाला आहे. त्यात भरपाई वसूल करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ट्रायचे चेअरमन रामसेवक शर्मा म्हणाले, कॉल ड्रॉपवर भरपाई किती मिळेल, हे तूर्त सांगू शकत नाही. मात्र, शुक्रवारी ट्रायकडून अधिसूचना जारी केली जाईल. दूरसंचार सचिव राकेश गर्ग आणि शर्मा यांची गुरुवारी भेट झाली. कॉल ड्रॉपवर किती दंड लावायचा याचा निर्णय त्यांच्या बैठकीत झाला.

पीएमओचाचझाला होता कॉल ड्रॉप
पंतप्रधानकार्यालयाचाच (पीएमओ) कॉल ड्रॉप झाल्यानंतर ही समस्या दूर करण्याच्या हालचालींना वेग आला. तेथून तत्काळ याची माहिती दूरसंचारमंत्र्यांना देण्यात आली. खुद्द मोदींनीही याबाबतीत वेगाने पावले उचलण्याचे आदेश दिले होते. त्यांनी या मुद्द्यावर कॅबिनेटच्या सहकाऱ्यांनाही मदतीचे आवाहन केले आहे.