आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक सुख-दुःखाच्‍या बातम्‍या पोहोचविल्‍या, आता 160 वर्षे जुनी सेवा होणार बंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- स्‍मार्टफोन, इमेल आणि एसएमएसच्‍या जमान्‍यात टपाल सेवेला बराच फटका बसला आहे. परंतु, आता दूरसंचार खात्‍याने टेलिग्राम सेवा बंद करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे 15 जुलै पासून 160 वर्षे जुनी टेलिग्राम सेवा संपुष्‍टात येणार आहे.

एकेकाळी महत्त्वाचा संदेश त्‍वरित पोहोचविण्‍यासाठी टेलिग्रामचा वापर करण्‍यात येत होता. अनेक आनंदाच्‍या तसेच धक्‍कादायक बातम्‍या याच टेलिग्रामने अनेक वर्षे नागरिकांपर्यंत पोहोचविल्‍या. परंतु, हळूहळू दुरध्‍वनी सेवा प्रगत झाली. त्‍यानंतर मोबाईल सेवा सुरु झाली. गेल्‍या काही वर्षांमध्‍ये स्‍मार्टफोनने दूरसंचार क्षेत्रात क्रांती आणली. एसएमएस आणि इमेलचा वापर वाढल्‍याने काही सेकंदांमध्‍येच एकाचवेळी अनेकांपर्यंत निरोप पोहोचविता येतो. त्‍यामुळे टेलिग्राम सेवेचा वापर जवळपास बंद झाला आहे. त्‍यामुळे अखेर 15 जुलैपासून ही सेवाच बंद करण्‍याचा निर्णय बीएसएनएलने घेतला आहे.

ही सेवा सुरु ठेवण्‍यासाठी खर्च वाढला होता. यासाठी सरकारने मदत करण्‍यासाठी आम्‍ही म्‍हटले होते. परंतु, तसे झाले नाही. त्‍यामुळे हा निर्णय घ्‍यावा लागला, असे बीएसएनएलच्‍या अधिका-याने सांगितले. सेवा बंद झाल्‍यामुळे कर्मचा-यांना बीएसएनएलच्‍या इतर विभागांमध्‍ये सामावून घेण्‍यात येणार आहे.