आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - भारतात दूरसंचार क्रांतीनंतर तार सेवेने (टेलिग्राम) जनमानसावर प्रभाव टाकला होता, परंतु कालौघात आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे 163 वर्षांच्या या सेवेचा रविवारी समारोप झाला. बीएसएनएलकडून ही घोषणा करण्यात आली. दरवर्षी 100 कोटी खर्च आणि 75 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली. सामान्य माणसाच्या सुख-दु:खाशी तारेची नाळ जोडलेली होती. बाळाचा जन्म, नोकरीपासून मृत्यूची वार्ताही तारेमुळे पोहोचवणे शक्य होते. पूर्वी शोक वार्ता आणणा-या तारेमध्ये जशी दु:खद घटनेची सुरुवात व्हायची, तसेच आता खुद्द तार सेवेबद्दल म्हणावे लागेल, ‘खेद आहे की, आता ‘तार ’ राहिली नाही !’
70 चे दशक गाजवले
भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात तार सेवा चांगली बहरात होती. युद्धातील शहीद जवानांची माहिती त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम त्या काळी तारेमुळेच शक्य झाले. शिवाय युद्धाच्या अनेक बातम्याही त्याद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचू शकल्या. युद्धाशिवाय 19 75-77 या आणीबाणीच्या काळातही संदेशवहनाची जबाबदारी तार सेवेने समर्थपणे पार पाडली.
टेलिग्राफिस्टचे काम काय असते ?
एकाच वेळी येणा-या हजारो संदेशांवर नियंत्रण ठेवून त्यांचे वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी टेलिग्राफिस्टवर असते. कोणत्याही संदेशामध्ये भावनिकदृष्ट्या गुंतून न राहता हे काम निष्ठेने करणे त्या काळी एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नव्हते, परंतु त्यासाठी राष्ट्रीय भावनेने प्रेरित होऊन काम केले जायचे, अशी आठवण निवृत्त ज्येष्ठ टेलिग्राफिस्ट गुलशन राय विज यांनी सांगितली. 75 वर्षीय विज 1959 मध्ये टेलिग्राफिस्ट म्हणून रुजू झाले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.