आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Telengana Formation Sanctioned By Union Government, Its 29th State In Country

तेलंगणा निर्मितीस केंद्राची मंजुरी, देशातील 29 वे राज्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तेलंगणा राज्य निर्मितीवर गुरुवारी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. 10 जिल्ह्यांचे मिळून तयार होणारे तेलंगणा हे देशातील 29 वे राज्य आहे. तत्पूर्वी रायल-तेलंगणा असे नवीन राज्य निर्माण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने 24 तासात मागे घेतला.
केंद्रीय मंत्रिगटाने सादर केलेल्या मसुद्यास पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. सकाळी काँग्रेस कोअर कमिटीची बैठक झाली होती. तत्पूर्वी आंध्र प्रदेशच्या विभाजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाने बुधवारी रायलसीमा भागातील दोन जिल्हे मिळून रायल-तेलंगणा निर्मितीचा प्रस्ताव सुचवला होता. त्याचे संतप्त पडसाद तेलंगणा भागासह संपूर्ण आंध्र प्रदेशातही पडले. तेलंगणा राष्ट्र समितीने बंद पुकारल्याने हैदराबादसह संपूर्ण तेलंगणा भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.
तेलंगणा भागातील दहा जिल्हे व रायलसीमा भागातील अनंतपुरम आणि कनरुल जिल्ह्यांचा समावेश करून नवे रायल तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात यावी, असा विचार केंद्र सरकार करीत असल्याचे वृत्त आले होते. या मंत्रिगटात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अर्थमंत्री पी.चिदंबरम, जयराम रमेश, ए.के.अँटनी, वीरप्पा मोईली आणि व्ही. नारायणसामी यांचा समावेश आहे.
सर्वपक्षीय नेत्यांचे पंतप्रधानांना निवेदन : रायल तेलंगणा निर्मितीच्या मुद्दय़ावर गुरुवारी तेलंगणा भागातील काँग्रेस खासदार व टीआरएसच्या नेत्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणेच 10 जिल्ह्यांसह तेलंगणा निर्मिती करण्यात यावी, अशी विनंती या नेत्यांनी पंतप्रधानांना केली.
काँग्रेसची खलबते
तेलंगणानिर्मितीला नवेच वळण लागल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गुरुवारी चर्चा केली. गुरुवारी कॅबिनेटच्या बैठकीत हा मुद्दा चर्चिला जाणार असल्याने सकाळी पंतप्रधान मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस कोअर ग्रुपमधील नेते या चर्चेला उपस्थित होते.
हैदराबाद ठप्प
रायल-तेलंगणाच्या निषेधार्थ टीआरएसने पुकारलेल्या बंदला हैदराबादसह विविध भागांत दणक्यात प्रतिसाद मिळाला. आंध्र प्रदेश राज्य परिवहन बस सेवा गुरुवारी कोलमडली. शाळा महाविद्यालये, दुकाने, बँका इतर व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. कोळसा खाणीतील अधिकारी-कामगारही बंद मध्ये सहभागी झाले होते.
आंध्र प्रदेशात संतप्त पडसाद उमटल्याने रायल-तेलंगणाचा प्रस्ताव मागे