आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीवर एक तासाला 12 मिनिटांचा ब्रेक; ऑक्टोबरपासून नियम लागू होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आगामी एक ऑक्टोबरपासून टीव्हीवरील कार्यक्रमांत जाहिरातींचे लांबलचक ब्रेक नसतील. प्रसारण नियामक ट्रायने एका तासाच्या कार्यक्रमात जाहिरात आणि प्रमोशनल क्लिप दाखवण्यासाठी जास्तीत जास्त 12 मिनिटांची कालमर्यादा निर्धारित केली आहे. आधी दूरचित्रवाणी वाहिन्या यासाठी तयार नव्हत्या. परंतु आता टप्प्याटप्प्याने कालमर्यादा लागू करण्यावर त्यांनी तयारी दर्शवली आहे.

इंडियन ब्रॉडकास्टिंग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी शैलेश शाह म्हणाले की, 12 मिनिटांचा हा नियम 8 वर्षापूर्वीचा आहे. परंतु सरकारने तो लागू केला नव्हता. टीव्ही इंडस्ट्री नवीन होती आणि उद्योगाची पाळेमुळे रुजण्याची गरज होती. वेळ कमी केल्याने टीव्ही चॅनल्सची कमाई घटण्याची शक्यता असून, जाहिराती महागण्याची चिन्हे आहेत. तथापि, जाहिरातींचे दर नेहमी बाजारच निश्चित करतो आणि आतादेखील तेच होईल, असे शाह म्हणतात.