आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Telugu Actress Arrested In Smuggling Of Red Sandal News In Marathi

चंदन तस्करांसोबत दाक्षिणात्य अॅक्ट्रेस नीतूचे साटेलोटे, पोलिसांनी केली अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाक्षिणात्य अभिनेत्री नीतू  अग्रवाल - Divya Marathi
दाक्षिणात्य अभिनेत्री नीतू अग्रवाल
नवी दिल्ली- लाल चंदन तस्करीप्रकरणी आंध्र प्रदेश पोलिसांनी दाक्षिणात्य अभिनेत्री नीतू अग्रवाल हिला अखर अटक केली. दोन दिवसांपासून ती फरार होती. चंदन तस्करांशी नीतूचे साटेलोटे असल्याचा आरोप आहे.

आरोपी नीतू अग्रवाल ही मूळ राजस्थानची रहिवासी असून 2013 मध्ये मस्तान वलीचा सिनेमा 'प्रेम प्रयाणम'मध्ये नीतूने भूमिका साकारली होती.
करनूल पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, नीतूला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चौकशीसाठी तिला रिमांडवर घेण्याची पोलिसांनी कोर्टाकडे विनंती केली आहे. त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. .

नीतूने एका चंदन तस्कराला पाठवले लाख रुपये...
27 वर्षीय टॉलीवूड अॅक्ट्रेसने दोन महिन्यांपूर्वी एका चंदन तस्कराच्या बॅंक खात्यात लाख रुपये पाठवले होते. बालू नाइक असे या तस्कराचे नाव असून त्याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केले आहे. चंदन तस्कारांच्या रॅकेटमध्ये नीतूचा सहभाग असल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.
नीतूने केला चंदन तस्कराशी विवाह?
चंदन तस्करीप्रकरणी वायएसआर कॉंग्रेस नेता आणि चंगलार्मी मंडळाचे अध्यक्ष के.एम.वली यांना पोलिसांनी 13 एप्रिलला अटक केले होते. के.एम.वली अर्थात मस्तान वलीशी आपला विवाह झाल्याचा दावा नीतूने केला आहे. वली आपल्याला खूप मारहाण करायचा तसेच तो परिसरातील सगळ्यात मोठा चंदन तस्कर असल्याचा गौप्यस्फोटही नीतूने केला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा नीतू अग्रवालचे फोटो...