भोपाल/जयपूर/नवी दिल्ली/पुणे- गेल्या दोन दिवसांपासून वाढलेली थंडी आणि दाट धुके यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. मात्र, हीच स्थिती 24 जानेवारीपर्यंत कायम राहू शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. दरम्यान, थंडीमुळे दिल्लीत आतापर्यंत सात लोक मुत्यूमुखी पडले असून, हिमाचलमध्ये बर्फवृष्टी होत आहे.
येत्या दिवसांत असे राहील हवामान....
- उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि समुद्रावर तयार झालेले बाष्प यामुळे येत्या दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुरळक भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.
- पंजाब, हरियाणा आणि दिल्लीवर वेस्टर्न डिस्टर्बेंसचा प्रभाव झाला आहे.
- 24 जानेवारीपर्यंत सकाळी आणि सायंकाळी दाट धुके असेल.
66 ट्रेन रद्द, अनेक गाड्यांना उशीर
- दाट धुक्याचा परिणाम ट्रेनच्या गतीवर झाला आहे.
- मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनसोबतच राजधानी आणि शताब्दी ट्रेन संथगतीने चालत आहे.
- बुधवारी 66 ट्रेन रद्द झाल्या, तर अनेक गाड्या 10 तासांनी उशिरा धावल्या.
- दिल्ली, यूपी आणि बिहारमधून धावणाऱ्या गाड्यांवर याचा अधिक परिणाम झाला.
राजस्थानमध्ये सर्वात कमी तापमान, एमपीमध्ये हलके उन्ह
- राजस्थान मागील सहा दिवसांपासून पारा खाली येत असून, धुके अधिक गडद होत आहे.
- या ठिकाणी कमीत कमी तापमान मंगळवारी रात्री 4.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. अधिक तापमान 21 अंश होते.
महाराष्ट्रात निफाड येथे सर्वात कमी तपामान
मंगळवारी महाराष्ट्राच्या नाशिकच्या निफाड येथे सर्वात कमी म्हणजे 5.4 अंश तापमान होते.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे तापमान (अंश सेल्सिअस मध्ये)
शहर |
तापमान |
औरंगाबाद |
10.6 |
पुणे |
8.2 |
जळगाव |
10 |
सोलापूर |
16.3 |
नगर |
7.6 |
पुढील स्लाइड्सवर पाहा,
संबंधित फोटोज....