आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ten Big Leaders May Be Out Of Politics After Decision On Supreme Court

सर्वोच्च न्यायालयाने उचलला बडगा; या प्रमुख 10 नेत्यांवर आहे टांगती तलवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवण्याच्या दृष्टीने देशात प्रथमच ठोस पाऊल बुधवारी उचलले गेले. वास्तविक हे काम संसदेचे आहे, पण सुप्रीम कोर्टाला शेवटी दखल घ्यावी लागली. आमदार किंवा खासदाराला एखाद्या गुन्ह्यात दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली तर आता या नेत्यांना तत्काळ निलंबित केले जाईल.
न्यायमूर्ती ए. के. पटनायक आणि एस. जे. मुखोपाध्याय यांच्या पीठाने हा निकाल दिला. याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. शिवाय, तुरुंगात राहून एखाद्या नेत्याला आता निवडणूक लढवता येणार नाही. एवढ्यावरच न थांबता सुप्रीम कोर्टाने गुन्हेगार आणि दोषी लोकप्रतिनिधींचे सुरक्षा कवच ठरलेले लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 8 (4) रद्द केले आहे. याचा अर्थ एखाद्या प्रकरणात दोषी ठरल्यावर अपील प्रलंबित असेल तर संबंधित नेत्याचे पद कायम राहायचे. आता दोषी ठरला की आमदार किंवा खासदारकी गमवावी लागेल. या निकालावर राजकीय पक्षांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण कोणत्या नेत्यांवर आहे टांगती तलवार