आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदार सचिन तेंडुलकरची राज्‍यसभेत दमदार सलामी, गदारोळाने स्‍वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरने आज एका वेगळ्या ठिकाणी दमदार सलामी दिली. फलंदाज म्‍हणून नव्‍हे तर खासदार म्‍हणून आणि ठिकाण होते राज्‍यसभा. खासदार सचिन तेंडुलकरने संसदेच्‍या पहिल्‍याच दिवशी हजेरी लावली. राज्‍यसभेचे कामकाज पहिल्‍या सत्रात दोन वेळा स्‍थगित झाले. परंतु, सचिनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. निळ्या रंगाच्‍या उभ्‍या रेषा असलेला शर्ट आणि काळ्या रंगाची पँट घातलेला सचिन सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

सचिनने संसदीय कार्य राज्‍यमंत्री राजीव शुक्‍ला यांच्‍यासोबत राज्‍यसभेत कामकाज सुरु होण्‍याच्‍या बराच वेळ आधीच प्रवेश केला. त्‍यानंतर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्‍तर यांच्‍यासोबतही त्‍याने दिर्घ चर्चा केली. कामकाज सुरु झाल्‍यानंतर सभाप‍ती आणि उपराष्‍ट्रपती हामिद अन्‍सारी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे चॅम्पियन्‍स करंडक स्‍पर्धा जिंकल्‍याबद्दल अभिनंदन केले. त्‍यावेळी सचिनने बाकांवर हात थापडून स्‍वागत केले. यावेळी त्‍याची पत्‍नी अंजली तेंडुलकर प्रेक्षक गॅलरीतून त्‍याचे बारकाईने निरिक्षण करत होती.