आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा क्षेत्रातील पहिला आणि सर्वात कमी वयात \'भारतरत्न\' मिळणारा सचिन पहिला भारतीय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे. 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार सी. राजगोपालाचारी यांना प्रदान करण्यात आला. एक प्रशस्तिपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आतापर्यंत 41 व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यात 10 मरणोत्तर पुरस्कार होते.

भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारा सचिन तेंडुलकर आठवा महाराष्ट्रीयन आहे. वयाच्या 40 व्या वर्षी या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित होणारा तो पहिला व्यक्ती असून भारतरत्न मिळविणारा पहिला खेळाडू आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत क्रीडाक्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जात नव्हता. या नियमात 2011 मध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीला दिला जाणारा हा पहिला पुरस्कार आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोणाचा भारतरत्न पुरस्कार घेतला परत...