आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एलअाेसी’वर तणाव; सैन्याची जमवाजमव! पाक हवाईदलाच्या हालचालीमुळे भारत सज्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उरीमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानदरम्यान तणाव वाढत चालला असून सीमेवरही अचानक हालचाली वाढल्या अाहेत. पाकने जोरदार लष्करी तयारी सुरू केल्याने भारतानेही युद्धजन्य स्थितीत आवश्यक सज्जता सुरू केली. यात ताबा रेषेवर नव्याने सैनिक तैनात करण्यात येत असून यासोबत शस्त्रास्त्रे आणि इंधनाचे साठेही वाढवण्यात येत आहेत. एकूणच युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

काही माध्यमांनी याबाबत दावा करताना म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री पुन्हा एकदा वॉर रूमला भेट देऊन बराच वेळ या ठिकाणी घालवला. ताबा रेषेवर सुरू असलेल्या लष्कराच्या हालचालींचा त्यांनी आढावा घेतला. संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनुसार, पाकिस्तानी हवाईदलाच्या अचानक हालचाली वाढल्या व लढाऊ विमानांनी लष्करी सराव सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर सतर्क झाले आहे. पाकिस्तानी हवाईदलाची विमाने उत्तरेकडील भागांत लष्करी सराव करत असून पाकव्याप्त काश्मीरमध्ये नो फ्लाय झोन जाहीर करण्यात आलेला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते
नफिस झकारिया यांनी पाकिस्तानी लष्कर देशाच्या संरक्षणासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे गुरुवारी दुपारी म्हटले होते.
पुढे वाचा...
> इस्लामाबादवर एफ-१६ विमानांच्या घिरट्या, इस्लामाबाद-पेशावर महामार्ग बंद
बातम्या आणखी आहेत...