आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसदेने मंजूर केला पाकिस्तान विरोधी प्रस्ताव, मंत्री म्हणाले याने नाही होणार फायदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकिस्तानकडून वारंवार होणारा गोळीबार आणि त्यानंतर पाकिस्तानच्या संसदेत भारत विरोधी प्रस्ताव सादर झाल्यानंतर भारत सरकारनेही कडक भूमिका घेतली आहे. भारतीय संसदेमध्ये पाकिस्तानविरोधी प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यात काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे. लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांनी या प्रस्तावाचे वाचन केले. सर्व सदस्यांनी एकमताने या प्रस्तावाला पाठींबा दिला. त्यानंतर सोमवारपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये एक दिवासपूर्वी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली आणि पंजाब विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावाचा विरोध करण्यात आला आहे. मीरा कुमार यांनी म्हटले आहे, की नॅशनल असेंब्लीने लक्षात घेतले पाहिजे, काश्मिरवर हल्ला म्हणजे भारतावर हल्ला आहे. पाकिस्तानी संसदेत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावात भारतीय सैनिक आणि लोकांविरोधात तथ्यहिन विधाने करण्यात आली आहेत.