आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संयमाचा अंत पाहू नका, संसदेचा पाकला इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय संसदेने बुधवारी पाकविरुद्ध निंदाव्यंजक ठराव एकमताने संमत केला. यात पाकच्या नॅशनल व पंजाब असेम्ब्लीत संमत भारतविरोधी ठरावाचा निषेध करण्यात आला. संयम व लष्करी क्षमतेची परीक्षा पाहू नये, असा इशाराही देण्यात आला.लोकसभा व राज्यसभेतील प्रस्तावात ताबा रेषेवर 6 ऑगस्टच्या पाक लष्कराच्या हल्ल्याचा निषेध व शहीद भारतीय जवानांना र्शद्धांजली अर्पण करण्यात आली. सोमवारी पाकमधील पंजाब प्रांत व तेथील संसदेने भारतविरोधी प्रस्ताव संमत केला होता.

आमच्या जवानांनी हल्ला केला नाही : भारतीय संसदेने निषेध करताच काही वेळाने दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त सलमान बशीर यांनी सहा ऑगस्टच्या हल्ल्यात लष्कराचा सहभाग नव्हता, असा दावा केला.