आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बियास दुर्घटनेची पुनरावृत्ती, दामोदर नदीत 10 तरुण थोडक्यात बचावले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रपुरा - मान्सूनच्या पहिल्याच पावसाने झारखंडमध्ये हाहाकार माजला आहे. गुरुवारी राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत होता. त्यामुळे नदी आणि धरणांमध्ये पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली दिसत आहे. अनेक ठिकाणी पूल पाण्यात बुडाले आहेत तर काही पूल वाहून गेले आहेत. यातच तेनूडॅम प्रकल्पासून पाणी सोडल्याने शुक्रवारी दामोदर नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. मात्र, त्यामुळे 10 युवकांचे प्राण धोक्यात आले होते. नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेलेले हे युवक पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे नदीत अडकले. सुमारे दहा तास हे सगळे युवक नदीमध्ये अडकलेले होते. तरुण अडकल्याची माहिती मिळताच प्रशासनाने, धरणातून पाणी सोडणे थांबवण्याचे आदेश दिले. अखेर रात्री 11 वाजता शेजारच्या खेतको येथील नागरिकांनी या तरुणांचे प्राण वाचवले.

- सर्व युवक 12 ते 16 वर्षा दरम्यानचे
- दोन तरुण वाहून बाहेर आले
- किना-यापासून 200 मीटर अंतरावर अडकले होते तरुण
पुढील स्लाइड्सवर पाहा नदीत अडकलेल्या युवकांचे फोटोज...