आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्‍फोटकांच्‍या कारसह 4 दहशतवादी पंजाबात, दिल्‍लीत हल्‍ल्याची शक्‍यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय सुरक्षा एजन्सीने मंगळवारी दिल्ली आणि पंजाबमध्‍ये अलर्ट जाहीर केला आहे. एजन्‍सीकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधून तीन कारमध्‍ये मोठ्या प्रमाणात हत्‍यारं आणि स्‍फोटकं घेऊन 4 दहशतवादी पंजाबमध्‍ये शिरले आहेत. तेथून ते दिल्‍लीकडे जातील अशी शक्‍यता व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. ढाका हल्‍ल्‍्यानंतर अलर्ट जारी..
तीन कारचा अद्याप पत्‍ता नाही.

पोलिस आणि एजन्सी या तिनही कार ट्रेस करण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहेत. अद्याप या कारबाबबत कोणतिही माहिती मिळाली नाही. दहशतवाद्यांच्‍या निशाण्‍यावर दिल्‍ली असल्‍याचे बोलले जात आहे. ढाकामध्‍ये झालेल्‍या हल्‍ल्‍्यानंतर एजन्‍सीने दिल्‍लीमध्‍येही असाच दहशतवादी हल्‍ला होण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे.
डिसेंबरमध्‍येही हल्‍ल्याचा प्रयत्‍न..
गेल्‍या वर्षी डिसेंबर महिन्‍यात दिल्लीमध्‍ये दहशतवादी हल्‍ला करण्‍याचा कट रचल्‍या गेला होता. दोन दहशतवादी राजधानीमध्‍ये शिरले होते. मात्र, त्‍यांचा हा कट अपयशी ठरला हे दोन्‍ही दहशतवादी पळून जाण्‍यात यशस्‍वी ठरले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...