नवी दिल्ली - लोकसभेत अध्यक्षांसोबत गैरवर्तनाचे प्रकरण समोर आले आहे. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींनी लोकसभाध्यक्षांच्या टेबलवर वस्तू आदळली. तेव्हा सभागृहात एससीएसडी विधेयकावर चर्चा सुरु होती. त्यांच्या या कृत्याला भाजपने तत्काळ आक्षेप घेतला आणि रंजन यांचे सदस्यत्व निलंबित करण्याची मागणी केली. मात्र रंजन यांनी लोकसभाध्यक्षांची माफी मागितली, त्यानंतर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी निलंबनाचा प्रस्ताव मागे घेण्यास सांगितला. त्याला भाजपने होकार दिला. अधीर रंजन चौधरी काँग्रेसचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
माफीने समाधानी नाहीत सुमित्रा महाजन
अधीर रंजन यांच्या कृतीने नाराज होऊन लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचे कामकाज एक तासांसाठी स्थिगत केले. त्यानंतर महाजन यांनी खासदार महोदयांकडे स्पष्टीकरण मागितले. त्यावर ते बोलू लागले तेव्हा, लोकसभाध्यक्ष म्हणाल्या, मी तुम्हाला भाषण देण्यास सांगितले नाही, येथे गोष्टी सांगू नका. महाजन म्हणाल्या, सदस्यांनी माफी कशी मागतात त्याचे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. मला उपदेश करण्याची गरज नाही. माझे प्रयत्न असतात की सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे. मात्र या घटनेने मला दुःख होत आहे. हातात तलवार घेऊन माफी नाही मागितली जात. जर माफी मागण्याचे तुमच्या मनातच नसेल तर त्या माफीचा काही अर्थ उरत नाही.
पुढील स्लाइडमध्ये, गृहमंत्र्यांवर पंतप्रधान नाराज