आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Terror Funding Case NIA Team Raided Jammu And Kashmir Srinagar Handwara, Baramulla

टेरर फंडिंग : काश्मिरमध्ये 12 ठिकाणी NIA चे छापे, फुटीरतावादी 7 नेत्यांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय तपास संस्थेने जम्मू-काश्मीरमधील 12 ठिकाणी छापेमारी केली आहे. - Divya Marathi
राष्ट्रीय तपास संस्थेने जम्मू-काश्मीरमधील 12 ठिकाणी छापेमारी केली आहे.
नवी दिल्ली/श्रीनगर - टेरर फंडिंग प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) जम्मू-काश्मीरमधील 12 ठिकाणी छापेमारी केली आहे. श्रीनगर, बारामुला आणि हिंदवाडा येथे एनआयएने कारवाई केली आहे. या प्रकरणात एनआयएने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता तथा हुर्रियत कॉन्फरन्स प्रमुख सय्यद अली शाह गिलानी यांचा मुलगा नईम आणि नसीम यांची चौकशी सुरु आहे. गिलानी यांना पाकिस्तान समर्थक फुटीरतावादी मानले जाते. तपास संस्थेने गिलानींचे जावई अल्ताफ अहमद शाह उर्फ अल्ताफ फंटूश याच्यासह 7 फुटीरतादावाद्यांना अटक करण्यात आली आहे.
 
न्यूज एजन्सीने म्हटल्यानुसार, एनआयए अधिकाऱ्यांनी सांगितले, श्रीनगर, बारामुला आणि हिंदवाडा येथे छापेमारी करण्यात आली आहे. ज्यांचे आरोपींसोबत संबंध आहे अशा लोकांच्या ठिकाण्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. 
- तपास संस्थेने गिलानी यांचे सुपुत्र नईम आणि नसीम यांची 9 ऑगस्ट रोजी दिल्लीत एनआयए हेडकॉर्टरमध्ये चौकशी केली होती. काश्मीरचे डिप्टी सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस फहीम अली यांच्याकडेही विचारपूस करण्यात आली आहे. एनआयएने राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकऱ्याची चौकशी करण्याची ही पहिलीच वेळ होती. 
बातम्या आणखी आहेत...