आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IBचा इशारा- 15 ऑगस्टला मोदींवर हल्ल्याची शक्यता, 20 वर्षांत प्रथमच एवढा मोठा धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनी (15 ऑगस्ट) प्रथमच लाल किल्ल्यावरुन भाषण करणार आहेत. गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार या दिवशी त्यांच्यावर दहशतवादी हल्ल्याचे संकट घोंघावत आहे. सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे, की पंतप्रधानांवर पाकिस्थान समर्थक दहशतवादी संघटना हल्ला करण्याची शक्यता आहे.
स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उधळण्याचा दहशतवाद्यांचा डाव
इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुप्तचर संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले आहे, की गेल्या 20 वर्षांमध्ये पंतप्रधानांच्या जीवाला एवढा मोठा धोका कधीही नव्हता. गुप्तचर संस्थेने संरक्षण यंत्रणा आणि गृहमंत्रालयाला सुचित केले आहे, की पंतप्रधानांवर थेट हल्ल्याशिवाय सीमी आणि लष्कर-ए-तोएबा सारख्या संघटना स्वातंत्र्य दिनाच्या सोहळा उधळण्यासाठी वर्दळीच्या भागात किंवा दिल्ली परिसरात दहशतवादी हल्ला घडवून आणू शकतात.
26/11 सारखा हल्ला होण्याची शक्यता
आयबी आणि एटीएस दहशतवाद्यांच्या योजनांची बारीकसारीक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी 26/11 सारखा हल्ला करण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधानांना ज्या पद्धतीचे सुरक्षा कडे आहे, ते भेदून त्यांच्या जवळ जाणे अशक्य आहे. सूत्रांनी सांगितले आहे, की स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिवशी पंतप्रधानांच्या ताफ्यातील वाहनांच्या एक किलोमीटर परिसरात कोणत्याही दुसर्‍या वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही.
20,000 हजार जवान सुरक्षेसाठी तैनात
लाल किल्ल्याच्या मार्गावर आणि लाल किल्ला परिसरात जवळपास वीस हजार जवान तैनात असणार आहेत. या मार्गावरील घरांवर शार्पशुटर, स्नॅपर तैनात असणार आहेत. ते पंतप्रधानांच्या ताफ्यावर नजर ठेवतील. याशिवाय दिल्ली पोलिस, अर्धसैनिक बल, एनएसजी कमांडो आणि सशस्त्र सैनिक असे 20,000 जवान तैनात केले जाणार आहेत. ज्या मार्गावरून पंतप्रधान जातील तो मार्ग 15 मिनीट आधीच रहदारीसाठी बंद केला जाईल.