आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये जवानांवर पुन्‍हा एकदा हल्‍ला, 2 जवान जखमी; सर्च ऑपरेशनदरम्‍यान घडली घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नवी दिल्‍ली - जम्‍मू काश्‍मीरमध्ये जवानांवर दहशतवाद्यांनी पुन्‍हा एकदा हल्‍ला केला आहे. दक्षिण काश्‍मीरमधील शोपियान जिल्‍ह्यात हा हल्‍ला झाला आहे. आज शोपियानमध्‍ये जवान दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन करत होते. तेव्‍हाच दहशतवाद्यांनी हा हल्‍ला केला. हल्ल्यात दोन जवानांसह एक नागरीक जखमी झाला आहे. दुसरीकडे कुलगाम जिल्‍ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्‍ये चकमक सुरु असल्‍याचे आणखी एक वृत्‍त हाती आले आहे.  
 
दक्षिण काश्मीरमधील 20 पेक्षा अधिक गावे केली रिकामी
- गुरुवारी सुरक्षा दलांनी दक्षिण काश्‍मीरमधील शोपिया जिल्‍ह्यातील 20 गावांना खाली करत दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम सुरु केली आहे. 
- शोपियामध्‍ये खुलेआम दहशतवादी फिरत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्‍यानंतर सुरक्षा दलांनी ही शोधमोहिम सुरु केली. 
- गुरुवारी सकाळी सुरु झालेल्‍या या ऑपरेशनमध्‍ये लष्‍कर, निमलष्‍करी दल आणि जम्‍मू काश्‍मीर पोलिसांचे 2500 ते 3000 जवान सहभागी आहेत.  
 
बातम्या आणखी आहेत...