आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात IS चा पहिला हल्ला, ट्रेन ब्लास्टपूर्वी दहशतवाद्यांनी सिरियाला पाठवले बॉम्बचे फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मंगळवारी भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या ब्लास्टमध्ये नवा खुलासा झाला आहे. मध्य प्रदेशचे सीएम शिवराज सिंह म्हणाले की, दहशतवाद्यांनी ट्रेनमध्ये पाइप बॉम्ब ठेवला होता. त्याचा फोटो सिरियामध्ये ISIS च्या म्होरक्यांना पाठवला होता. हा ब्लास्ट देशात आयएसआयएसचा पहिला हल्ला आहे

काम पूर्ण करून लखनऊला परतणार होते, दहशतवादी 
- शिवराज यांनी एएनआय या न्यूज एजन्सीला सांगितले की, दहशतवादी लखनौ आणि कन्नौजचे होते. त्यांना त्यांचे काम संपवून लखनौला परतायचे होते. 
- दहशतवाद्यांकडे जी स्फोटके मिळाली आहेत त्यावर लिहिले आहे, 'आयएसआयएस-आम्ही भारतात आहोत'. 
- दहशतवाद्यांनी ट्रेनमध्ये बॉम्ब फिट केल्याचे फोटो सिरियातील म्होरक्यांना पाठवले. त्यावरून हे सिद्ध होते की, ते आयएसआयएसशी संलग्न होते. 

इंटरनेटद्वारे शिकले बॉम्ब बनवायला 
- शिवराज यांनी हेही सांगितले की, दहशतवाद्यांनी बॉम्ब बनवण्याचे संपूर्ण मॅकेनिझम इंटरनेटद्वारे शिकले. त्यानंतर त्यांनी ब्लास्ट करण्याचे ट्रेनिंग घेतले. 
- पाइप बॉम्ब अपर बर्थमध्ये ठेवण्यात आला. बॉम्ब स्फोटासाठी 2 तासांचा टायमरही लावला होता.
- बॉम्ब अपर बर्थवर असल्याने हानी कमी प्रमाणात जाली. 
- आमचे एटीएस केंद्राच्या संस्थांबरोबर सतत संपर्कात होते. त्यामुळे मास्टरमाइंड अतिक मुजफ्फर, मोहम्मद दानिश आणि  सय्यद मीर हुसैनला अटक केली आहे. 
- एमपीचे आयजी लॉ अँड ऑर्डर मकरंद देऊस्कर यांनीदेखिल भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेला स्फोट दहशतवादी हल्लाच असल्याचे म्हटले आहे. 
- देऊस्कर म्हणाले होते, हा एक आयईडी ब्लास्ट होता. आयईडी ब्लास्ट हा नेहमी दहशतवादी हल्लाच असतो. 

केव्हा झाला ब्लास्ट?
- 7 मार्चला सकाळी 9. 38 मिनिटांनी कालापीपल जवळच्या जबडी स्टेशनजवळ हा स्फोट झाला. शाजापूरहून डॉग स्क्वॉड घटनास्थळाकडे रवाना झाले. भोपाळहून बॉम्ब रोधक पथक पाठवण्यात आले. एसपी मोनिका शुक्ला मौके घटनास्थळी पोहोचल्या आहेत. 
- मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले होते. सीएम शिवराज सिंह म्हणाले की, एटीएस आणि फॉरेंसिक टीम तपास करत आहे. या घटनेवर माझे लक्ष आहे. 
 
पुढे पाहा, संबंधित फोटो..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...