आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुंना ठार मारण्यासाठी आलो होतो, छदमी हसत म्हणाला दहशतवादी उस्मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मी येथे हिंदुंना ठार मारण्यासाठी आलो होतो. माझे हेच काम आहे, जम्मू-काश्मिरच्या उधमपूरमध्ये जिवंत पकडलेला दहशतवादी नावेद ऊर्फ उस्मान ऊर्फ कासिम याने सांगितले आहे. त्याने कबुल केले आहे, की तो पाकिस्तानमधील फैसलाबादचा रहिवासी आहे. 12 दिवसांपूर्वीच पाकिस्तानातून भारतात आला होता. लष्कराच्या जवानांनी ठार मारलेला त्याचा सहकारी मोमिनसोबत तो उधमपूर जिल्ह्यात रक्तपात करण्यासाठी आला होता.
मला यातून आनंद मिळतो
ग्रे कलरचा शर्ट आणि ब्राऊन कलरचा ट्राऊजर घातलेल्या उस्मानला स्थानिक लोकांनी पकडून लष्कराच्या हवाली केले. त्यापूर्वी त्याने स्थानिक लोकांशी संवाद साधला. तेव्हा तो अगदी निवांत बसला होता. पकडला गेल्याची जराही भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. छदमी हसत तो सांगत होता, की आम्ही दोघे 12 दिवसांपूर्वीत भारतीय सिमेत आलो होतो. दिवसरात्र जंगलात भटकत येथवर आलो. माझा सहकारी पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. केवळ मी जिवंत सापडलो. हे सगळे अल्ला करीत आहे. मला लोकांना ठार मारण्यात मजा येते.
पहिले 20 नंतर 16 सांगतले वय
उस्मानने सुरवातीला सांगितले, की माझे वय 20 वर्षे आहे. त्यानंतर त्याने घुमजाव केले. माझे वय 16 असल्याचे सांगितले. त्याने आपले नावही बदलून सांगितले. सुरवातीला तो म्हणाला माझे नाव कासिम आहे. नंतर म्हणाला, उस्मान आहे. आणि आता सांगतोय, की माझे नाव नावेद आहे. वारंवार शब्द फिरवणारा हा दहशतवादी लष्कराला फसवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून अशा स्वरुपाचे प्रशिक्षण दिले जाते, असे विश्लेषक सांगतात. उस्मानला पकडले तेव्हा तो जैश-ए-महंमदचा दहशतवादी असल्याचे सांगितले जात होते.
थोडक्यात वाचले बीएसएफचे जवान, असा मारला पाकिस्तानी दहशतवादी... वाचा पुढील स्लाईडवर