आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K : 48 तासांनंतरही पंपोरमध्ये घमासान सुरुच, पाक मीडियाने म्हटले, \'हा सर्व ड्रामाच\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुमारे 48 तासांपासून चकमक सुरू आहे. - Divya Marathi
सुमारे 48 तासांपासून चकमक सुरू आहे.
श्रीनगर - पंपोरच्या सरकारी इमारतीमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात लष्कराची कारवाई सुरुच आहे. मंगळवारी रात्रभर याठिकाणी घमासान सुरू होते. 48 तासांपासून लष्कर आणि दहशतवाद्यांत चकमक सुरू आहे. त्यात दोन जवान जखमी झाले आहेत. तर एका दहशतवाद्याचा मृतदेहही ड्रोनमध्ये आढळून आला आहे.

सोमवारी पंपोरच्या सीआरपीएफ जवानांच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या आैद्येगिक विकास संस्थेच्या (जेकेईडीआय) इमारतीत दडून बसले होते. त्यांच्या विरोधातील मोहिमेदरम्यान लष्कराने इमारतीत स्फोट घडवले होते. मंगळवारी देखील मोठ्या स्फोटांचे आवाज येत होते, परंतु दहशतवाद्यांकडून गोळीबार झाला नाही. सुरक्षेमुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय राज्य मार्गावरील पंथा चौक ते पंपोरच्या दिशेने येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दहशतवाद्यांच्या विरोधातील लष्करी मोहीम अद्याप बंद झालेली नाही, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.
पाक मीडियाने म्हटले, हे सर्व नाटक..
पाकिस्तानच्या एका वाहिनीने पंपोरमध्ये होत असलेले एन्काऊंटर हा ड्रामा असल्याचे म्हटले आहे. 24 तासांनंतरही भारतीय सैन्याला आत जाता येत नसेल तर त्यांच्यात क्षमताच नाही का, असे पाक मीडियाने म्हटले आहे.

ड्रोनने पाहिला अतिरेक्याचा मृतदेह
ईडीआयइमारतीमध्ये कारवाईसाठी लष्कराने ड्रोनची मदत घेतली आहे. ड्रोनच्या साह्याने अतिरेक्याचा मृतदेह पाहण्यात आला आहे. दहशतवाद्यांची संख्या ते असावी, असा अंदाज आहे, परंतु इमारत खूप मोठी आहे. त्यामुळे ही इमारत स्फोटकांनी उडवून देण्याचा निर्णय सैन्याला टाळावा लागला आहे.
जुलूस काढणाऱ्या जमावाला पांगवले..
श्रीनगरमध्ये महोरम निमित्पात रंपरिक मिरवणूक काढण्याच्या प्रयत्नात असलेले तरूण आणि सुरक्षा दलांत चकमक झाली. त्यानंतर गर्दीला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या वापरण्यात आल्या. याठिकाणी सुरक्षेच्या कारणावरून 90 च्या दशकापासून यावर बंदी आहे. तरीही जुलूस काढण्याचा प्रयत्न झाल्याने कारवाई करण्यात आली.
रूमडीधारा पाकिस्तानने पीआेकेच्या जवळील गावात यापुढे हल्ला केल्यास त्याला स्थानिक गावकरीच आपल्या पद्धतीने प्रत्युत्तर देणार आहेत. गावकऱ्यांनी सुरक्षेसाठी सरकारकडे शस्त्रांची मागणी केली आहे. राजौरी जिल्ह्यातील नौशहरा भागात अनजाना खानका, दरियाला, गंगरोट सारखी गावे पीआेकेजवळ येतात. भारताच्या सर्जिकल स्ट्राइकला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान हल्ले करू शकते. त्यामुळे गंगरोट गावचे सरपंच सूरम सिंह म्हणाले, हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. या गावांत अनेक माजी सैनिकही आहेत.

सीआरपीएफवर ग्रेनेड
शॉपिया जम्मू-काश्मीरच्या शॉपिया जिल्ह्यात मंगळवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर ग्रेनेडने हल्ला केला. त्यात सीआरपीएफचे दोन जवान सात नागरिक जखमी झाले. शॉपियांच्या शिंगलू चौकात तैनात जवानांवर ग्रेनेडने हल्ला करून दहशतवाद्यांनी धूम ठोकली. परिसरात तपास मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रदेशात सैन्याच्या अतिरिक्त दलास पाठवण्यात आले आहे.

समुदायाचा मिरवणुकीचा प्रयत्न
श्रीनगरश्रीनगरच्या जुन्या भागात मंगळवारी शिया समुदायाकडून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. शिया समुदायाच्या वतीने ताजिया काढण्यात येत असताना ही कारवाई झाली. त्यावर ९० च्या दशकापासून बंदी आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...